भाजपा आमदाराचा पोलिस अधीक्षकांवर मारहाणीचा आरोप

धीरज ओझा प्रतापगड जिल्ह्यातील राणीगंज येथील भाजपाचे आमदार आहेत. जेव्हा आमदार गोंधळ घातला होते, तेव्हा घटनास्थळी पोलिसांची उपस्थिती देखील दिसून येते. व्हीडिओमध्ये आमदार धीरज ओझा जोरात ओरडताना दिसत आहेत. भाजपाचे आमदार धीरज ओझा यांनी जिल्हाधिकारी निवासस्थानासमोर धरणे आंदोलन केले. तसेच, आमदारांनी जमिनीवर पडून गोंधळ घातला. तसेच, मारहाण करण्याची धमकी दिल्याचा आरोप या भाजपाच्या आमदाराने केला.

    प्रतापगड :  उत्तर प्रदेशमधील प्रतापगड जिल्ह्यातील भाजपाचे आमदार धीरज ओझा यांचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जिल्ह्यातील पोलिस अधीक्षकांनी (एसपी) त्यांना कार्यालयात मारहाण केल्याचा आरोप करत भाजपा आमदार फाटलेला कुर्ता दाखवत आहेत. तसेच, व्हीडिओमध्ये आमदार रस्त्यावर गोंधळ घालताना दिसत आहेत आणि आजूबाजूला लोकांची गर्दी दिसून येत आहे.

    धीरज ओझा प्रतापगड जिल्ह्यातील राणीगंज येथील भाजपाचे आमदार आहेत. जेव्हा आमदार गोंधळ घातला होते, तेव्हा घटनास्थळी पोलिसांची उपस्थिती देखील दिसून येते. व्हीडिओमध्ये आमदार धीरज ओझा जोरात ओरडताना दिसत आहेत. भाजपाचे आमदार धीरज ओझा यांनी जिल्हाधिकारी निवासस्थानासमोर धरणे आंदोलन केले. तसेच, आमदारांनी जमिनीवर पडून गोंधळ घातला. तसेच, मारहाण करण्याची धमकी दिल्याचा आरोप या भाजपाच्या आमदाराने केला.

    फाटलेल्या कपड्यांमध्ये ते जिल्हाधिकारी कार्यालयातून बाहेर आले. दरम्यान, मतदार यादीमध्ये नाव जोडण्यासाठी भाजपाचे आमदार जिल्हाधिकारी निवासस्थानासमोर आंदोलन करत होते. यावेळी निवासस्थानाजवळ जिल्हाधिकारी आणि पोलिस अधिकक्षक उपस्थित होते. हे प्रकरण प्रतापगडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाचे आहे.