kanvarlal meena

२००५ साली तत्कालीन उपविभागीय दंडाधिकारी रामनिवास मेहता यांच्यासोबत मनोहरथाना विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार असणाऱ्या कंवरलाल मीणा यांचा वाद झाला. मीणा यांनी या वादा दरम्यानच रिव्हॉल्व्हर काढून मेहता यांच्यावर रोखली. मेहता यांना जीवे मारण्याची धमकीही मीणा यांनी दिली.

राजस्थान : सरकारी कर्मचाऱ्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याने जिल्ह्यातील अतिरिक्त जिल्हा न्यायालयाने तीन वर्षांचा तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. राजस्थानमधील मनोहरथाना येथील भाजपचे माजी आमदार कंवरलाल मीणा यांनी उपविभागीय दंडाधिकारी रामनिवास मेहता यांच्यावर बंदूक रोखून जीवे मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणात माजी आमदार दोषी आढळल्याने न्यायालयाने कारवाई केली आहे.

हे प्रकरण १५ वर्षे जुने असून या घटनेनंतर आमदाराला अटक करण्यात आली होती. माहितीनुसार

या प्रकरणामध्ये मनोहरथानाच्या अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी प्रकरणामधील शक्यतांचा विचार करता २०१८ साली मीणा यांनी निर्दोष मुक्तता केली. सरकारी वकील असणाऱ्या अकलेरा यांनी या निर्णयाविरोधात अतिरिक्त जिल्हा न्यायालयामध्ये याचिका दाखल करत निकालाला आवाहन दिले होते.

सोमवारी अतिरिक्त जिल्हा न्यायालयाने या प्रकरणात आपला निकाल दिला. अतिरिक्त जिल्हा न्यायाधिश असमी कुलश्रेष्ठ यांनी उपलद्ध साक्षीदार, नोंदवण्यात आलेले जबाब यांच्या आधारे माजी आमदाराला दोषी ठरवले. सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी दोन वर्षांचा तुरुंगवास आणि दंड तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल तीन पीडीपीपी अॅक्ट अंतर्गत एकूण तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. मीणा यांना अतिरिक्त जिल्हा न्यायालयाच्या या निकालानंतर अटक करण्यात आली आहे. जिल्हा रुग्णालयामध्ये त्यांना नेऊन त्यांची कोरोना चाचणी करुन तुरुंगामध्ये त्यांची रवानगी करण्यात येणार आहे. मीणा हे एकदाच आमदार म्हणून निवडून आले होते.