mamata banerjee

जपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दोन दिवसाच्या दौऱ्यात संपूर्ण पश्चिम बंगालमधील राजकारण ढवळून काढले. मात्र, त्यांच्या या दौऱ्यानंतर भाजप खासदाराच्या पत्नीने टीएमसीत प्रवेश केला. यामुळे भाजपात खळबळ उडाली. पत्नीच्या या निर्णयामुळे नाराज झालेल्या खासदाराने थेट पत्नीलाच तलाक देण्याची नोटीस पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे खळबळ उडाली आहे.

कोलाकाता : बंगाल विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा गड खालसा करण्यासाठी भाजपाने मास्टर प्लानच बनवल्याचे दिसत आहे. भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दोन दिवसाच्या दौऱ्यात संपूर्ण पश्चिम बंगालमधील राजकारण ढवळून काढले. मात्र, त्यांच्या या दौऱ्यानंतर भाजप खासदाराच्या पत्नीने टीएमसीत प्रवेश केला. यामुळे भाजपात खळबळ उडाली.

पत्नीच्या या निर्णयामुळे नाराज झालेल्या खासदाराने थेट पत्नीलाच तलाक देण्याची नोटीस पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे खळबळ उडाली आहे.

सौमित्र खान असे या खासदाराचे नाव आहे. सुजाता मंडल असं त्यांच्या पत्नीचे नाव आहे. मी अनुसूचित जमातीतून येणारी दलित महिला असून मला राजकारणात भाजपसह पतीशीही लढाई लढावी लागली आहे. भाजपमध्ये केवळ संधीसाधूंनाच संधी दिली जात असल्याचा आरोप सुजाता यांनी केला. त्यामुळेच मी भाजपमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्या म्हणाल्या.