sadhvi pradnya thakur

भाजपच्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर(BJP MP Pragya Thakur) भोपाळ महापालिकेच्या एका कार्यक्रमात बोलत होत्या. यावेळी त्यांनी इंधन दरवाढ हा काँग्रेसच्या प्रोपगंडा(Fuel Prize Hike Is A Propaganda By Congress) असल्याचे म्हटले आहे.

    देशभरात पेट्रोल डिझेलचे(Petrol And Diesel Prize Hike) भाव गगनाला भिडले आहेत. मात्र एका भाजपा खासदाराने इंधन दरवाढीविषयी वेगळीच मुक्ताफळे उधळली आहेत.भाजपच्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर(BJP MP Pragya Thakur) भोपाळ महापालिकेच्या एका कार्यक्रमात बोलत होत्या. यावेळी त्यांनी इंधन दरवाढ हा काँग्रेसच्या प्रोपगंडा(Fuel Prize Hike Is A Propaganda By Congress) असल्याचे म्हटले आहे.नवीन बसेसचं लोकार्पण आणि नव्या पंपहाऊसचं उद्घाटन असा हा कार्यक्रम होता. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून हे उद्घाटन केलं.

    ठाकूर म्हणाल्या, हे लोक जे प्रोपगंडा पसरवत आहेत की पेट्रोल आणि डिझेल महाग झालं आहे. महागाई वगैरे काही नाही. ही काँग्रेसची मानसिकता आहे. फुकटचा प्रोपगंडा आहे. प्रदुषणमुक्त गाड्या उपलब्ध करुन दिल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री चौहान यांचे आभार मानले . त्या म्हणाल्या, पूर्वी रिक्षातून जाताना तोंडाला रुमाल लावावा लागत होता. कारण धूळ आणि प्रदुषणचं इतकं होतं.

    दरम्यान, काँग्रेसचे प्रवक्ते नरेंद्र सलुजा यांनी याबद्दल ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये ते म्हणतात, पूर आला..काँग्रेसमुळे? महागाई आली..नेहरुंच्या भाषणामुळे? महागाईची अडचण आहे तर अफगाणिस्तानात जा? आणि आता प्रज्ञा सिंग ठाकूर म्हणतायत की महागाई वगैरे काही नाही, ही काँग्रेसची मानसिकताच आहे, त्यांचा प्रोपगंडा आहे? यांचं मानसिक संतुलन तपासायला हवं.