बलात्कार पीडितेचे फोटो नावासहित फेसबुकवर व्हायरल केले; भाजपच्या महिला खासदाराचं संतापजनक कृत्य

विधवा महिलेसोबत सामूहिक बलात्कार झाल्याची घटना मध्य प्रदेशात घडली. या प्रकरणातील बलात्कार पीडितेचे फोटो नावासहित फेसबुकवर व्हायरल केले आहेत. भाजपच्या महिला खासदाराने हे खासदाराचं संतापजनक कृत्य केले आहे. या प्रकारानंतर नेटकऱ्यांनी या महिला खासदारावर जोरदार टीका केली.

भोपाळ : विधवा महिलेसोबत सामूहिक बलात्कार झाल्याची घटना मध्य प्रदेशात घडली. या प्रकरणातील बलात्कार पीडितेचे फोटो नावासहित फेसबुकवर व्हायरल केले आहेत. भाजपच्या महिला खासदाराने हे खासदाराचं संतापजनक कृत्य केले आहे. या प्रकारानंतर नेटकऱ्यांनी या महिला खासदारावर जोरदार टीका केली.

मध्य प्रदेशच्या सीधी जिल्ह्यात एका विधवा महिलेवर सामूहिक बलात्कार झाला. बलात्कारानंतर तिच्यावर लोखंडी रॉडनेही अत्याचार करण्यात आले. तिची प्रकृती नाजूक असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणात चार आरोपींना अटक झाली आहे.

दरम्यान, भाजपच्या खासदार रीती पाठक यांनी पीडितेच्या कुटुंबाची भेट घेतली. या भेटीचे फोटो त्यांनी आपल्या फेसबुक पेजवर टाकले. त्या फोटोवर त्यांनी पीडितेच्या नावासह तिच्यावर झालेल्या भीषण बलात्काराचा उल्लेख करत तिची ओळख सार्वजनिक केली. बरेच तास ती पोस्ट तशीच फेसबुकवर होती.

बलात्कार पीडितेची ओळख सार्वजनिक करता येत नाही असा सर्वोच्च न्यायालयाच्या नियम असताना या महिला खासदाराने फेसबुकवर तिची माहिती टाकली. पीडितेचे सांत्वन करण्याऐवजी या महिला खासदाराने तिच्या जखमेवर मीठ चोळले आहे.