tirath rawat

उत्तराखंडचे मुख्यमंत्री तिरथ सिंग रावत यांनी काही वेळापूर्वीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आणि पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा (J. P. Nadda) यांची भेट घेतली. सुमारे ४० मिनिटं चाललेल्या या बैठकीनंतर तिरथ सिंग रावत यांना राजीनामा(Resignation Of Tirath Sing Rawat) देण्याचे आदेश मिळाल्याचे समजते.

    नवी दिल्ली : भाजपच्या गोटातून एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री तिरथ सिंग रावत (Uttarakhand Chief Minister Tirath Singh Rawat) यांना पदावरून पायउतार होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तिरथ सिंग हे सध्या दिल्ली (Delhi) दौऱ्यावर आहेत.उत्तराखंडचे मुख्यमंत्री तिरथ सिंग रावत यांनी काही वेळापूर्वीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आणि पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा (J. P. Nadda) यांची भेट घेतली. सुमारे ४० मिनिटं चाललेल्या या बैठकीनंतर तिरथ सिंग रावत यांना राजीनामा(Resignation Of Tirath Sing Rawat) देण्याचे आदेश मिळाल्याचे समजते.

    तिरथ सिंग यांच्या जागी कुणाची वर्णी लागणार हे पुढच्या एक -दोन दिवसांमध्ये स्पष्ट होईल, अशीही माहिती भाजपमधील सूत्रांकडून मिळत आहे. डेहरादूनमध्ये शनिवारी किंवा रविवारी भाजपच्या सर्व आमदारांची बैठक होईल आणि हे आमदार आपला नवा सभागृह नेता निवडतील, असं सांगण्यात येत आहे. आता मुख्यमंत्रीपदी कुणाची वर्णी लागणार, याबाबत तर्कवितर्क सुरू झाले आहेत.

    नुकतीच मुख्यमंत्रीपदी वर्णी लागलेल्या तिरथ सिंग रावत यांना अचानक दिल्लीतून बोलावणं आल्यामुळं ते दिल्ली दरबारी दाखल झाले. त्यांनी अमित शाह आणि जे. पी. नड्डा यांची भेट घेतली. त्यांच्यापाठोपाठ भाजपचे दुसरे स्थानिक नेते सतपाल महाराज आणि धन सिंग रावत यांनादेखील दिल्लीत बोलावण्यात आलं.

    पक्षाध्यक्षांसोबतच्या बैठकीनंतर तिरथ सिंग शनिवारी लगेच डेहरादूनला परत जाणार होते. मात्र त्यांचा परतीचा कार्यक्रमही रद्द झाला असून त्यांना दिल्लीतच थांबवण्याचे आदेश मिळाले आहेत.

    तिरथ सिंग रावत यांनी १० मार्च रोजी उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. चार महिने व्हायच्या आत त्यांना पदावरून पायउतार व्हावं लागत आहे. पुढील वर्षी उत्तराखंड विधानसभेच्या निवडणुका आहेत. या निवडणुका तीरथ सिंग रावतांच्या नेतृत्वाखाली व्हाव्यात, हे पक्षातील वरिष्ठांना पसंत नसल्यामुळे आतापासूनच नेतृत्वबदलाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. आता मुख्यमंत्रीपदी कुणाची वर्णी लागते, याकडं सर्वांचं लक्ष आहे.