भाजपने आसाममधील १५ नेत्यांना दिला डच्चू, ६ वर्षांसाठी पक्षातून केले निलंबित

विधानसभा निवडणुकीच्या(election) पूर्वी भाजपाने मोठी कारवाई करत १५ नेत्यांना(15 bjp leaders suspended in assam) बाहेरचा रस्ता दाखवत डच्चू दिला आहे. या सर्वांना पक्षविरोधी कारवायांमध्ये सहभागी असण्याचा आरोप लावण्यात आला आहे.

  गुवाहाटी: आसाममध्ये (Assam)आगामी विधानसभा निवडणुकीच्या(election) पूर्वी भाजपाने मोठी कारवाई करत १५ नेत्यांना बाहेरचा रस्ता दाखवत डच्चू दिला आहे. या सर्वांना पक्षविरोधी कारवायांमध्ये सहभागी असण्याचा आरोप लावण्यात आला आहे.

  या सर्व नेत्यांची प्राथमिक सदस्यता ६ वर्षांसाठी रद्द करण्यात आली आहे. आसामध्ये भाजपाने विधानसभेचे माजी उपाध्यक्ष दिलीप कुमार पॉल सहित १५ नेत्यांना ६ वर्षांसाठी पक्षातून निलंबित केले आहे.

  निलंबित केलेले नेते निवडणुकीत तिकीट न मिळाल्यामुळे आधीच नाराज होते व त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला होता. भाजपा प्रदेश महासचिव राजदीप रॉय यांनी पक्षाचे आसाम प्रदेश अध्यक्ष रंजीत कुमार दास यांनी तात्काळ कारवाईला मंजुरी दिली असल्याचे सांगितले. निलंबित केलेल्या सदस्यांमधील एक पॉलदेखील आहेत. ज्यांनी तिकीट न मिळाल्यामुळे भाजपा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता व आता ते सिलचर मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत.

  दुसरीकडे, काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर प्रहार केला आहे. पक्षाने अनेक प्रश्न उपस्थित करत आरोप केला आहे की, आसामसाठी त्यांच्याकडून ज्या मोठमोठ्या घोषणा करण्यात येत आहेत, त्या मोठा शून्य सिद्ध होणार आहे. काँग्रेस महासचिव रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले की, संपूर्ण देशात आसाम आपली संस्कृती, सहिष्णुता, संयम व सद्भावनेसाठी ओळखले जाते. आसाम सर्व काही सहन करेल, परंतु खोटे सहन करणार नाही, असेही ते म्हणाले.

  आसाम विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी कॉलेज विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी राहुल गांधी यांनी सांगितले की, काँग्रेस राज्यात नागरिकता कायदा लागू करणार नसल्याचे सांगितले. तुम्हाला वाटत असेल की लोकशाहीत घट झाली आहे. तरुण बेरोजगार आहेत, शेतकरी विरोध करीत आहेत, सीएए आहे. ते केंद्रात असले तरी आसामच्या लोकांना ते आपली संस्कृती, भाषा विसरण्यास सांगू शकत नाही. नागपूरमध्ये निर्माण झालेली शक्ती संपूर्ण देशाला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.

  ते पुढे म्हणाले की, तुमचे विभाजन करण्यात येत आहे. एका धर्माला दुसऱ्या धर्माविरोधात लढविले जात आहे. एका व्यक्तीविरोधा दुसरा व्यक्ती उभा करण्यात येत आहे. जे तुमचे आहे ते हिसकावून उद्योगपती मित्रांना देण्यात येत आहे.

  हेमंत बिस्वा सरमांचे शक्तिप्रदर्शन
  आसाममधील चाणक्य म्हणून ओळखले जाणारे हेमंत बिस्वा सरमा जालुकबारी मतदारसंघातून अर्ज दाखल करणार आहेत. अर्ज भरण्यापूर्वी त्यांनी रोड शो केला. ते भाजपचे उमेदवार आहेत. या मतदारसंघात त्याचा बराच प्रभाव असल्याचे मानले जाते.२००१ ते २०१५ पर्यंत या जागेवरून ते विजय पताका झळकवत आहेत. हेमंत बिस्वा सरमा यांना मुख्यमंत्री बनवण्याचीही चर्चा आहे. नामांकन दाखल करण्यापूर्वी हेमंत बिस्वा सरमा यांनी शक्तिप्रदर्शन केले.