tirath rawat

उत्तराखंडमध्ये त्रिवेंद्र सिंह रावत(trivendra singh rawat) यांच्यावर पक्ष नाराज असल्याची चर्चा सुरू होती. भाजपा आमदारांनी रावत यांच्याबद्दल पक्षाकडे नाराजी व्यक्त केली.त्यामुळे त्रिवेंद्र सिंह रावत यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर तीरथ सिंह रावत(tirath singh rawat is new chief minister of uttarakahand) यांची मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

    उत्तराखंडचे मुख्यमंत्री(uttarakhand chief minister) त्रिवेंद्र सिंह रावत(trivendra singh rawat) यांनी आपल्या पदाचा काल राजीनामा दिला. त्यानंतर मुख्यमंत्रीपद कोणाला मिळणार अशी चर्चा सुरु होता. अखेर या चर्चांना पुर्णविराम मिळाला आहे. कारण तीरथ सिंह रावत आता उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री असणार आहेत. आजच्या भाजप बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

    उत्तराखंडमध्ये त्रिवेंद्र सिंह रावत यांच्यावर पक्ष नाराज असल्याची चर्चा सुरू होती. भाजपा आमदारांनी रावत यांच्याबद्दल पक्षाकडे नाराजी व्यक्त केली.त्यामुळे त्रिवेंद्र सिंह रावत यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. मंगळवारी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर रावत यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा राज्यपालांकडे सोपवला.

    रावत यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्रीपदासाठी ४ नावांची चर्चा सुरु होती. मात्र भाजपाच्या देहरादून येथे झालेल्या बैठकीत तीरथ सिंह रावत यांची निवड करण्यात आली.

    मिळालेल्या माहितीनुसार तीरथ सिंह रावत आज (१० मार्च) संध्याकाळी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. तीरथ सिंह रावत हे उत्तराखंडमधील गढवाल लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधी आहेत.