पश्चिम बंगालमध्ये भाजपला दोन आकडी जागादेखील मिळणार नाहीत, प्रशांत किशोर यांचा दावा

दोनशेहून अधिक जागा निवडून आणण्यचा गृहमंत्री अमित शाहा यांचा दावा पोकळ असून प्रत्यक्षात भाजपला पश्चिम बंगालमध्ये दोन आकडी जागादेखील मिळवता येणार नाहीत, असा दावा प्रशांत किशोर यांनी केलाय. प्रशांत किशोर यांची तृणमूल काँग्रेसने निवडणूक धोरण प्रमुख म्हणून नियुक्ती केलीय.

पश्चिम बंगालच्या निवडणुका पुढील वर्षी होणार आहेत. मात्र आतापासून निवडणुकीचा माहौल तयार व्हायला सुरुवात झालीय. दोन दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी भाजप २०० पेक्षा अधिक जागा मिळवेल, असा दावा केला होता. हा दावा फेटाळून लावत तृणमूल काँग्रेसचे स्ट्रॅटेजिस्ट प्रशांत किशोर यांनी भाजपवर टीका केलीय.

दोनशेहून अधिक जागा निवडून आणण्यचा गृहमंत्री अमित शाहा यांचा दावा पोकळ असून प्रत्यक्षात भाजपला पश्चिम बंगालमध्ये दोन आकडी जागादेखील मिळवता येणार नाहीत, असा दावा प्रशांत किशोर यांनी केलाय. प्रशांत किशोर यांची तृणमूल काँग्रेसने निवडणूक धोरण प्रमुख म्हणून नियुक्ती केलीय.

भाजपला दोन आकडी जागादेखील मिळणार नाहीत, असं ट्विट त्यांनी केलं असून हे ट्विट जपून आणि सेव्ह करून ठेवण्याचं आवाहनदेखील त्यांनी नेटिझन्सना केलंय. यापेक्षा अधिक काही भाजपच्या हाती लागलं, तर आपण सोशल मीडियावरून बाहेर पडू, असं त्यांनी म्हटलंय.

तर पश्चिम बंगालचे भाजप प्रभारी कैलास विजयवर्गीय यांनी नाव न घेता प्रशांत किशोर यांना प्रत्युत्तर दिलंय. भाजपची सध्या बंगालमध्ये त्सुनामी आली असून निवडणुकीनंतर देशाला एक निवडणूक नितीतज्ज्ञ गमवावा लागेल, अशी टीका त्यांनी केलीय.

ममता बॅनर्जींचे एकेकाळचे निकटवर्तीय शुभेंदू सरकार यांच्यासह तृणमूलच्या १० आमदारांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे भाजपची राज्यातील ताकद वाढली आहे. निवडणुकीपर्यंत ममता बॅनर्जी एकट्याच तृणमूल काँग्रेसमध्ये उरतील, अशी टीका गृहमंत्री अमित शाह यांनी केली होती.