कोयंबतूर दक्षिण मतदारसंघातून भाजपच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा विजयी, तर तमिळनाडूमध्ये कमल हासन यांचा पराभव

  अभिनेता – राजकारणी कमल हासन यांना मोठा धक्का बसला आहे. भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा वानती श्रीनिवासन यांनी हासन यांना पराभूत केले. कोयंबतूर दक्षिण जागेवर राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष लागून होते. शेवटी भाजपने येथे आपला विजय नोंदविला आहे. दरम्यान, तमिळनाडूमध्ये संत्तातर झाले असून आता डीएके युती सत्तेत आली आहे.

  दरम्यान तामिळनाडूमध्ये आता स्टॅलिन युग सुरू झाले आहे. राज्यात द्रविड राजकारणाचा सर्वात मोठा नायक म्हणून एमके स्टालिन यांच्या नेतृत्वाखालील डीएके युती तमिळनाडूमध्ये पुढचे सरकार स्थापन करणार आहे. राज्यात पहिल्यादाच राजकारणातील दोन मोठे नेते जयललिता आणि एम. करुणानिधीविना लढल्या गेलेल्या या निवडणुकीत एआयएडीएमकेला मोठा पराभव स्वीकारावा लागला आहे.

  स्टॅलिन युगाची सुरुवात

  राज्यात आता स्टॅलिन युग सुरू झाले आहे. तामिळनाडूमधील द्रविड मुनेत्र कझागम (द्रमुक) च्या नेत्रदीपक कामगिरीनंतर स्टॅलिन यांनी राज्यात लोकप्रिय नेता म्हणून आपली ओळख निर्माण करू शकतात. या निवडणुकीत स्टॅलिन व्यतिरिक्त इतर अनेक मुख्यमंत्रीपदाचे दावेदार होते, ज्यात एआयएडीएमकेचे ई. पलानीस्वामी, एएमएमकेचे टीव्हीव्ही दिनाकरण आणि एमएनएमचे कमल हासन यांचा समावेश होता.

  विजयानंतर स्टॅलिन यांनी जनतेचे आभार मानले

  पहिल्यांदा तामिळनाडूचे मुख्यमंत्री बनणार असलेल्या द्रमुकचे अध्यक्ष एमके स्टॅलिन यांनी रविवारी आपल्या पक्षाला विजय मिळवून दिल्याबद्दल राज्यातील जनतेचे आभार मानले. त्यांनी त्यांच्यासाठी प्रामाणिकपणे काम करू असे आश्वासन दिलंय. आपल्या पक्षाला सहाव्या वेळेस तामिळनाडूवर राज्य करण्याचा अधिकार मिळाल्याबद्दल स्टॅलिन यांनी राज्यातील सर्व लोकांचे मनापासून आभार व्यक्त केले.