गुजरातमधील गांधीनगर महापालिका निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय, ४४ पैकी ४१ जागांवर मिळाले यश

गांधीनगर महानगरपालिका निवडणुकीत(Gandhinagar Municipal Corporation Election) भाजपाने दणदणीत विजय(Bjp Victory In Gandhinagar Election) मिळवला आहे.

    गुजरातमधील(Gujrat) गांधीनगर महानगरपालिका निवडणुकीत(Gandhinagar Municipal Corporation Election) भाजपाने दणदणीत विजय(Bjp Victory In Gandhinagar Election) मिळवला आहे. तसेच काँग्रेस व आम आदमी पार्टीच्या वाट्याला मात्र अपयश आले आहे. या निवडणुकीत भाजपाने ४४ पैकी ४१ जागांवर विजय मिळवला आहे. काँग्रेसला दोन जागांवर तर आम आदमी पार्टीला केवळ एका जागेवरच समाधान मानावं लागलं.

    गांधीनगर महापालिका निवडणुकीत ११ वॉर्डामधील ४४ जागांसाठी एकूण १६२ उमेदवार रिंगणात होते. महापौरपद हे अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहे. तसेच एससी प्रवर्गाच्या सर्व पाच जागांवर भाजपाने विजय मिळवलेला आहे. महापालिका निवडणुकीचे मतदान रविवारी पार पडले. त्यानंतर मंगळवारी मतमोजणी झाली.

    या निवडणुकीत आम आदमी पार्टीने देखील उमेदवार उभे केल्याने त्रिशंकू पाहायला मिळाली. आम आदमी पार्टीने ४० जागांवर उमेदवार उभे केले होते.  अन्य उमेदवारांमध्ये बसपाचे १४, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन, अन्य पक्षांचे सहा आणि अपक्ष ११ उमेदवारांचा समावेश होता. जवळपास ५६.२४ टक्के मतदान झाले होते.

    मनपा निवडणुकीत भाजपाला दणदणीत विजय मिळाल्यानंतर, पक्षाकडून जनतेचे आभार व्यक्त करण्यात आले. भाजपा प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील यांनी म्हटले की ४४ पैकी ४१ जागांवर भाजपाला जनतेने विजयी केलं आहे. यावरून हे दिसून येते की लोकांचा पंतप्रधान मोदींवर विश्वास आहे. तसेच या निवडणुकीतून हे देखील स्पष्ट झाले की, गुजरातमध्ये दुसऱ्या पक्षासाठी काही स्थान नाही.