अन्यथा भाजपने बंगालमध्ये ५० जागाही जिंकल्या नसत्या, ममता बॅनर्जींचा पुन्हा निवडणूक आयोगावर हल्लाबोल

बंगालमध्ये विजय संपादन केल्यानंतर एका इंग्रजी वृत्तवाहिनीशी बोलताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी भाजपा आणि निवडणूक आयोगावर टीका केलीय. निवडणूक आयोगानं मदत केल्यामुळेच भाजप इथपर्यंत झेप घेऊ शकला. पश्चिम बंगालमध्ये निवडणूक आयोगाची वागणूक भयानक होती. निवडणूक आयोगाचं पॅनल भाजपचा प्रवक्ता असल्याप्रमाणं वागत होतं, असं बॅनर्जी म्हणाल्या. 

    पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसनं घवघवीत यश संपादन केलं. तृणमूल काँग्रेसला एकूण २१३ जागा मिळाल्या. निवडणूक आयोगानं भाजपला मदत केली नसती, तर भाजप ५० जागाही जिंकू शकलं नसतं, अशी टीका मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केलीय.

    बंगालमध्ये विजय संपादन केल्यानंतर एका इंग्रजी वृत्तवाहिनीशी बोलताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी भाजपा आणि निवडणूक आयोगावर टीका केलीय. निवडणूक आयोगानं मदत केल्यामुळेच भाजप इथपर्यंत झेप घेऊ शकला. पश्चिम बंगालमध्ये निवडणूक आयोगाची वागणूक भयानक होती. निवडणूक आयोगाचं पॅनल भाजपचा प्रवक्ता असल्याप्रमाणं वागत होतं, असं बॅनर्जी म्हणाल्या.

    आपण रस्त्यावर उतरून काम करणाऱ्या कार्यकर्त्या आहोत, असं बॅनर्जींनी म्हटलंय. आपण २०० पेक्षा जास्त जागा जिंकू आणि भाजप ७० च्या पुढे जाणार नाही, असं पहिल्यापासून आपण सांगत होतो, असं बॅनर्जींनी म्हटलंय. भाजपला निवडणूक आयोगानं मदत केली नसती आणि भाजपच्या सोयीनं निवडणुकीच्या टप्प्यांचं नियोजन केलं नसतं, तर भाजपला ५० जागांवरही यश मिळवता आलं नसतं, असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलंय.

    नंदीग्राममध्ये मतांमध्ये छेडछाड झाली असून तिथली मतमोजणी पुन्हा करावी,अशी मागणी निवडणूक आयोगाकडं केल्याचं त्या म्हणाल्या. मतदानाच्या दिवशी मी स्वतः केंद्राबाहेर ३ तास बसून होते. कुणालाही मतदान करू दिलं जात नव्हतं, असा आरोपही त्यांनी केलाय.