उत्तर प्रदेशमध्ये कायदा आणि सुव्यस्थेचे धिंडवडे ; भाजपा कार्यकर्त्याने गोळ्या घालून केली हत्या, एकाचा मृत्यू

उत्तर प्रदेशात (UTTAR PRADESH) एका व्यक्तीची भाजप आमदाराच्या (BJP MLA) कार्यकर्त्याने एकाची गोळ्या (SHOOT BY THE GUN) घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना आज गुरूवारी बलियामध्ये (BALIYA) घडली आहे.

उत्तर प्रदेशात (UTTAR PRADESH) एका व्यक्तीची भाजप आमदाराच्या (BJP MLA) कार्यकर्त्याने एकाची गोळ्या (SHOOT BY THE GUN) घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना आज गुरूवारी बलियामध्ये (BALIYA) घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रेशन दुकांनांसंबंधी बैठक सुरु असताना वाद निर्माण झाला आणि त्यानंतर हा प्रकार घडला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (YOGI ADITYANATH) यांनी घटनेची दखल घेतली असून घटनास्थळी उपस्थित अधिकाऱ्यांच्या निलंबनाचा आदेश दिला आहे.

रेशन दुकानांच्या वाटपासाठी बैठक बोलावण्यात आली होती. पण सदस्यांमध्ये असलेल्या वादामुळे अधिकाऱ्यांनी बैठक रद्द करण्याचा निर्णय घेतला. याचवेळी वाद निर्माण झाला आणि गोळीबार करण्यात आला. एका तंबूत सुरु असलेल्या या बैठकीसाठी प्रशासकीय तसंच पोलीस अधिकारी उपस्थित होते. परंतु भाजपा कार्यकर्ता धिरेंद्र सिंह याने जयप्रकाश यांची गोळ्या घालून हत्या केली. धिरेंद्र सिंह भाजपा आमदार सुरेंद्र सिंह यांचे निकटवर्तीय आहेत. गोळीबार झाल्यानंतर घटनास्थळी एकच धावपळ सुरु झाली होती.

पीडित व्यक्तीच्या भावाने केलेल्या तक्रारीनंतर १५ ते २० जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. दरम्यान योगी आदित्यनाथ यांनी उपविभागीय दंडाधिकारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि काही इतरांच्या निलंबनाचा आदेश दिला आहे.