बिहारमध्ये भाजपाचा २०१९चा राज्यातील वंचित बहुजनचा सुधारीत प्रयोग, ओवेसी ठरले तेजस्वी-राहूलसाठी भाजपची ‘टिम बी’

बिहारची निवडणूक कोरोना काळातील देशातील पहिलीच निवडणूक होती, त्यामुळे या वेळच्या निवडणुकीत जसा आरोग्याच्या दृष्टीने संसर्ग होणार नाही याची काळजी घेतली जात होती. तसेच आता निकालानंतरही या निकालांचा राजकीय संसर्ग होणार नाही.याची देखील काळजी घेतली जात असल्याची बोलकी प्रतिक्रिया राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या एका घटकपक्षांच्या अध्यक्षांनी खाजगीत बोलताना दिली.

‘होळी सरली कवित्व उरले म्हणतात’ तसे यावेळच्या बिहार निवडणुकांचे (Bihar Elections) महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात कवित्व उरले आहे. दहा तारखेला निकाल लागले त्यादिवशी सायंकाळी उशीरापर्यंत राज्यातील (State) प्रमुख सत्ताधारी आणि विरोधीपक्षांतील नेत्याचे लक्ष या निकालांच्या उशीराने होणा-या निर्णायक चालीकडे लागून राहिले होते. याचे कारण तेजस्वी यादव (Tejaswi Yadav) यांनी मोदी ब्रिगेडला शेवटपर्यत कडवी झुंज दिल्याचे दिसत होते. कोणीही राजकीय नेते घाईने प्रतिक्रिया देण्याच्या मनस्थितीत नव्हते. (काही अपवाद सोडल्यास!) या निकालाचे गंभीर परिणाम राज्याच्या राजकारणावर होणार असे त्यामागचे कारण सांगितले जात होते.

बिहारची निवडणूक कोरोना काळातील देशातील पहिलीच निवडणूक होती, त्यामुळे या वेळच्या निवडणुकीत जसा आरोग्याच्या दृष्टीने संसर्ग होणार नाही याची काळजी घेतली जात होती. तसेच आता निकालानंतरही या निकालांचा राजकीय संसर्ग होणार नाही.याची देखील काळजी घेतली जात असल्याची बोलकी प्रतिक्रिया राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या एका घटकपक्षांच्या अध्यक्षांनी खाजगीत बोलताना दिली. अगदी सावधपणे निकालाकडे पाहात उशीरापर्यंत प्रतिक्रिया देण्यास संयम बाळगणा-या महाराष्ट्र भाजपचे महत्वाचे नेते आणि बिहारचे प्रभारी म्हणून कामगिरी करणारे देवेंद्र फडणवीस यांनी देखील बिहारमध्ये ‘महाराष्ट्र पँटर्न’ नसल्याचे नंतर आवर्जून सांगत टिकाकारानां थोपविण्याचा प्रयत्न केला. त्यात भाजपला मुख्यमंत्री आपलाच म्हणण्याची घाई नाही असेच अभिप्रेत होते, म्हणजे ‘मी पुन्हा येईन’ वाली चूक भाजप बिहारमध्ये करणार नाही असे त्यांना म्हणायचे होते.

तरीही त्यांना असे आग्रहाने सांगावे लागावे यातच सारे काही आले असे म्हणावे अशी स्थिती आहे. या मागचे कारण निवडणुकांच्या सा-या नियोजनात २०१९ला राज्यात झालेल्या वंचित बहुजन आघाडीच्या प्रयोगाची सुधारीत आवृत्ती घडविण्यासाठीच देवेंद्र फडणवीस यांना बिहारमध्ये प्रभारी करण्यात आले होते अशी उघड चर्चा आता राजकीय वर्तुळातून केली जात आहे. भुपेंद्र यादव यांच्या मदतीने २०१९ प्रमाणेच त्यांनी बिहारचे नियोजन केले होते. असद्दूदीन ओवेसी यांनी पाच जागांवर अनपेक्षीत यश मिळवताना राजदच्या ११ जदयूच्या २३ तर कॉंग्रेसच्या १४ अश्या सुमारे ४५ जागांवर ‘वोटकटवा’ म्हणून भुमिका बजावली आहे. कॉंग्रेसच्या ३० ते ३५ जागा मिळण्याची आशा असताना या वोट कटवा राजकारणामुळे ओवेसी चिराग मायावती यांच्या उमेदवारांनी त्या चटक केल्या आहेत! हेच काम २०१९मध्ये प्रकाश आंबेडकर-ओवेसी यांच्या ‘भिम आणि मिम’ समिकरणातून करण्यात आले होते.

त्यांच्या समिकरणातून २०१९मध्ये सुमारे ५६ जागांवर कॉंग्रेस राष्ट्रवादीला नुकसान झाले. तर भाजपच्या जागा शिवसेनेसोबत युती असल्याने वाढल्या असताना शिवसेनेला देखील किमान ८ ते दहा जागा वंचितच्या उमेदवारांमुळे कमी झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतरच शिवसेनेने युती बाजूला ठेवून महाविकास सोबत जाण्याचा धाडसी निर्णय घेतला आणि अनेक कारणांपैकी हे देखील त्या निर्णयामागे महत्वाचे कारण होते. असे काही जाणकार सांगतात, त्यामुळे याच धर्तीवर भाजपने आता मुख्यमंत्रीपदाचा हट्ट करत महाराष्ट्र पँटर्न बिहारला राबविला तर आधीच एनआरसी सिएए ला सोबत असताना जाहीर विरोध करणारे नितीश यांनी मागील वेळी लालू यांच्या लाल टेनसोबत सत्ता स्थापने केल्याचा इतिहास आहेच, त्यामुळे जास्त जागांचे समाधान मिळवताना मुख्यमंत्रीपदासाठी अति घाई संकटात नेई हे भाजपला चांगलेच माहिती असो.

तर बिहारमध्ये भाजपाने महाराष्ट्र पँटर्न नसल्याचे कितीही नाकारले तरी वंचित बहुजनचा राज्यातील २०१९चा सुधारीत प्रयोग झाला याचे काही दाखले सध्या राजदच्या नेत्यांनीच दिले आहेत. त्यामुळे भाजप विरोधकांना ओवेसी खलनायक ठरले आहेत. ओवेसी यांनी पाच जागा मिळवताना राजदच्या अकरा जागांचे नुकसान केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे ओवेसी मैदानात नसते तर राजदचे सत्तांतर नक्की झाले असते हे देखील स्पष्ट होते. नितीश यांच्य ऍन्टीइन्कबन्सी फँक्टरच्या मतांचे विभाजन करण्यात चिराग पासवान यांच्या लोजपा, मायावती यांच्या बसपा आणि ओवेसी यांच्या एमआयएम ने भाजपची ‘टिम बी’ म्हणून काम केले! भाजपची राम मंदीर आणि हिंदूत्वाची हुकूमी मते भाजपला मिळाली मात्र नितीश विरोधी सेक्यूलर मतांचे विभाजन करण्यात २०१९ला महाराष्ट्रात दोन्ही कॉंग्रेस विरोधात झाले तसेच या आघाडीच्या समिकरणाने घडवून आणले आहे.

महाराष्ट्राच्या २०१९च्या निवडणुकीतील भुपेश यादव आणि देवेंद्र फडणवीस या जोडीचे नियोजन त्यासाठी उपयोगी ठरल्याची माहिती जाणकार सूत्रांनी दिली आहे. ओवेसी यांनी जदयू आणि राजद सह कॉंग्रेसच्या उमेदवारांची दलित मुस्लिम अतिपिछडा वोट बँकचा लक्ष्यभेद करत मतांची पळवापळवी केली आहे. बिहारच्या सिमावर्ती भागात जेथे मुस्लिम मते निर्णायक आहेत तेथे २४ जागांवर हा संघर्ष तिव्रतेने लक्षाय येतो. याच ठिकाणी आंध्रमधून येवून ओवेसी यांनी पाच जागा अनपेक्षीतपणे पटकालवल्या!

उदाहरणच द्यायचे झाले तर पूर्णिया जिल्ह्यात अनेक वर्ष कॉंग्रेस आमदार असलेल्या अब्दुल जलील मस्तान यांना यावेळी अकरा टक्के मते मिळाली, तर बाहेरून आलेल्या एम आयएमने त्यांना पराभूत करत ५ ५ टक्के मते पटकावली आहेत, याचे कारण चिराग आणि मायावती यांच्याउमेवारांसह दलित आणि मुस्लिम मतांची फोड करण्यात भाजपला यश आले. बहादूरगंज मध्ये कॉंग्रेसच्या तौसिफ यांना दहा टक्के मते मिळाली तर ओवेसीच्या पक्षाला ४७ टक्केपेक्षा जास्त मते मिळाली त्यामुळे थोड्या फरकाने किमान ४० ते ४५ महागठबंधनचे उमेदवार शेवटच्या टप्प्यात पराभूत झाले आहेत.

त्या शिवाय जंगलराज संपल्याच्या प्रतिक्रिया देणा-या भाजपच्या नेत्यांविरोधात आणखी गंभीर आरोप करताना राजदच्या नेत्यांनी उशीराने होत असलेल्या निकाल घोषणांबाबत आक्षेप घेतला आहे. ११९ जागा जिंकल्या असताना त्यातून दहा जागांचे प्रमाणपत्र देण्यास निवडणुक अधिका-यांनी घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. त्याच बरोबरीने मतांच्या गणनेमध्ये देखील गडबड होत असल्याने निकालास उशीर लागल्याचा आरोप केला आहे. राजद चे नेता मजोज झा यांनी आरोप केला की जिल्हाधिका-यांवर दबाव आणून राजदच्या जिंकलेल्या जागांवर भाजप उमेदवारांना विजयाचे प्रमाणपत्र देण्यात आले. आता याबाबत राजदला न्यायालयात जाण्याची तयारी करावी लागत आहे.

सुशील मोदी यांच्या कार्यालयातून जिल्हाधिका-यांवर दबाव होता की राजदचे निकाल ११० पेक्षा जास्त लागत असल्यास त्यांना रोखण्यात यावे असा आरोप झा यांनी केला आहे, यासाठी हिलसा विधानसभा मतदारसंघाचे बोलके उदाहरण दिले जात आहे राजद उमेदवार शक्ति सिंह यांना निर्वाचन अधिका-यांनी ५४७ मतांनी विजयी घोषित केले. मात्र सर्टिफ़िकेट घेण्याच्या प्रतिक्षेत असतानाच मुख्यमंत्री निवास स्थानातून रिटर्निंगऑफिसरला फोन आला आणि अचानक अधिकारी म्हणू लागले की पोस्टल बँलेट रद्द झाल्याने १३ मतांनी तुम्ही हारले आहात, त्यावर आता राजद न्यायालयात जाणार आहे! या शिवाय यावेळच्या निवडणुक निकालांच्या संथ मोजणी मागे नेहमीचा भाजप- ईव्हीएम युतीचा विजय हे देखील कारण असल्याचा आरोप केला जात आहेच!