भाजपचे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी मदतग्रस्तांसाठी आणलेल्या चादरी चोरल्या? ; FIR दाखल

हिमांग्शू मन्ना आणि प्रताप डे नामक दोन व्यक्तींनी नगरपालिकेच्या गोदामातून ताडपत्रींचा एक ट्रक चोरून नेला आहे. यामागे सुवेंदू अधिकारी आणि त्यांचे बंधू सौमेंदू अधिकारी असून, केंद्रीय सुरक्षा दलांची यासाठी मदत घेण्यात आली, असा आरोप करण्यात आला आहे.

    कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये(West Bengal) नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सुवेंदू अधिकारी हे नाव चर्चेत आले होते. निवडणुकीनंतर ही भाजप व तृणमूल काँग्रेसमधील वाद अद्याप कमी झालेला नाही. या उलट सातत्याने त्यात वाढ होताना दिसत आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना निवडणुकीत पराभूत केल्यानंतर वेंदू अधिकारी यांना भाजपने(BJP) विधीमंडळ नेता आणि विरोधी पक्षनेते बनवले. परंतु याचा सुवेंदू अधिकारी यांच्यावर मदत साहित्य चोरल्याचा आरोप करत तक्रार दाखल करण्यात आली आहे. नुकत्याच येऊन गेलेल्या ‘यास’ चक्रीवादळाचा फटका पश्चिम बंगाला बसला. वादळामुळे नुकसान झालेल्या भागातील नागरिकांना मदतकार्य सुरू असताना मिदनापूर जिल्ह्यातील कोंटाई येथील पोलीस स्थानकांना भाजपचे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी आणि त्यांचे बंधू सौमेंदू अधिकारी यांच्याविरोधात तक्रार नोंदवण्यात आली आहे,ही तृणमूल काँग्रेसने मदत साहित्य चोरल्याचा आरोप केला आहे.

    ताडपत्रीचा ट्रकच केला गायब

    कोंटाई नगरपालिकेत काम करणाऱ्या व्यवस्थापन मंडळातील सदस्य असलेल्या रत्नदीप मन्ना यांनी पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी कारवाई करत प्राथमिक माहिती अहवाल दाखल करून घेतला आहे. यामध्ये २९ मे रोजी हिमांग्शू मन्ना आणि प्रताप डे नामक दोन व्यक्तींनी नगरपालिकेच्या गोदामातून ताडपत्रींचा एक ट्रक चोरून नेला आहे. यामागे सुवेंदू अधिकारी आणि त्यांचे बंधू सौमेंदू अधिकारी असून, केंद्रीय सुरक्षा दलांची यासाठी मदत घेण्यात आली, असा आरोप करण्यात आला आहे. या तक्रारीच्या आधारे आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत सुवेंदू अधिकारी, सौमेंदू अधिकारी, हिमांग्शू मन्ना आणि प्रताप डे यांच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी प्रताप डे याला अटक करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.