shivrajsingh chaouvan

भोपाळ. मध्य प्रदेशात येत्या काही दिवसांत पोटनिवडणुका होणार आहेत. या पोटनिवडणुकीपूर्वी येथीळ शिवराज सरकारने शेतकऱ्यांना मोठी भेट दिली आहे. राज्यातील शेतकर्‍यांना आता दर वर्षाला १० हजार रुपयांची मदत केळी जाणार, अशी घोषणा मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केली आहे. ‘पीएम किसान सन्मान निधी योजनेतून शेतकऱ्यांना दर वर्षाला सहा हजार रुपये देण्यात येत आहेत. त्यामध्ये आता मुख्यमंत्री किसान सम्मान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वर्षाला दोन हप्त्यामध्ये चार हजार रुपये देण्यात येणार आहेत, असे शिवराजसिंह चौहान यांना सांगितले.

दरम्यान, मध्यप्रदेश विधानसभेच्या २७ जागा रिक्‍त आहेत. भाजपाला राज्यातील सरकार वाचवण्यासाठी या रिक्‍त जागांवरील कमीत कमी नऊ जागांवर विजय मिळवणे गरजेचे आहे. तर दुसरीकडे मध्य प्रदेशातील आगामी पोटनिवडणुका कोणत्याही सार्वत्रिक निवडणुका नाहीत किंवा केवळ पोटनिवडणूक नाहीत तर राज्याचे भविष्य ठरविण्याची निवडणूक’ आहे, असे काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री ‘कमलनाथ यांनी नुकतेच म्हटले आहे. त्यामुळे या पोटनिवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या ‘पोटनिवडणुकीत विजय मिळावा, यासाठी शिवराज सरकार प्रयत्नशील आहे. याच पार्श्वभूमीब शिवराज सरकारने राज्यातील शेतकर्‍यांना भेट दिली आहे.