yogi adityanath

हैदराबादमध्ये (Hydrabad) सभा घेतलेल्या नेत्यांपैकी उ.प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Chief Minister Yogi Adityanath) यांची सभा विशेष गाजली होती. त्यांनीही या निकालावर आनंद व्यक्त करताना, भाग्यनगरचा भाग्योदय सुरु झाला आहे, असे ट्विट (Ttweet) केले आहे.

हैदराबाद :  भारतीय जनता पार्टीने (BJP) ग्रेटर हैदराबाद महापालिका निवडणुकीत (HME) मोठं यश मिळवत दुसऱ्या क्रमांकाचे स्थान पटकावले आहे. भाजपाच्या २०१६ साली केवळ ४ जागा होत्या, त्या वाढून आता ४८ झाल्या आहेत. त्यामुळे भाजपाच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे. ही निवडणूक भाजपाने प्रतिष्ठेची करत बड्या नेत्यांच्या या निवडणुकीच्या प्रचारात उतरवले होते. हैदराबादमध्ये सभा घेतलेल्या नेत्यांपैकी उ.प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Chief Minister Yogi Adityanath) यांची सभा विशेष गाजली होती. त्यांनीही या निकालावर आनंद व्यक्त करताना, भाग्यनगरचा भाग्योदय सुरु झाला आहे, असे ट्विट केले आहे.

जीएचएमसीच्या निकालात तेलंगणा राष्ट्र समिती (टीआरएस)ने पहिले स्थान मिळवले असले तरी त्यांचे संख्याबळ ९९ वरुन ५५ वर आले आहे, दुसऱ्या क्रमाकांवर भाजपाने झेप घेत ४ वरुन ४८चा आकडा गाठला आहे. तर असुद्दीन ओवेसी यांचा एमआयएम पक्षाला ४४ जागा मिळाल्या आहेत. एमआयएमने तिसरे स्थान पटकावले आहे. तर राष्ट्रीय काँग्रेसला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले आहे. १५० सदस्य संस्था असलेल्या महापालिकेत कुणालाच स्पष्ट बहुमत न मिळाल्याने सत्तेच्या चाव्या मात्र एमआयएमकडे आल्या आहेत.

भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

१ डिसेंबरला ग्रेट हैदराबाद महापालिका निवडणुकांसाठी १५० प्रभागांत मतदान झाले होते, त्यापैकी १४९ जागांचे निकाल जाहीर झाले असून, एका प्रभागातील मतमोजणी हायकोर्टाने रोखली आहे. भाजपाच्या यशाबाबत सांगताना या निवडणुकांचे प्रभारी भूपेंद्र यादव यांनी आनंद व्यक्त केला आहे. आलेले निकाल हे उत्साहवर्धक आणि भाजपा कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवणारे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर आणि राबवित असलेल्या प्रशासनावर सर्वच क्षेत्रात असलेला विश्वास यानिमित्ताने दिसला आहे. आता भाजपाचे लक्ष्य २०२३ साली होणाऱ्या विधानसभा निवडणुका असणार आहेत.

कुणाचे किती उमेदवार रिंगणात
टीआरएस – १५०
भाजपा-१४९
काँग्रेस -१४६
टीडीपी – १०६
एमआयएम- ५१
सीपीआय-१७
सीपीआयएम-१२
अपक्ष-७६, ४१५