ब्लॅक फंगस पोहचला रुग्णाच्या मेंदुत; डॉक्टरही चक्रावले

देशातील कोरोना बाधितांची संख्या काही प्रमाणात कमी होत असतानाच ब्लॅक फंगसचा धोका वाढताना दिसत आहे. ब्लॅक फंगस आजार जडलेल्या रुग्णांचा आकडा आता 5 हजार 500 वर पोहोचला आहे. या आजारामुळे आतापर्यंत सव्वाशेहून अधिक जणांचा जीव गेला आहे. त्यातच आता ब्लॅक फंगस थेट मेंदूवर वार करत असल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. गुजरातच्या सूरतमध्ये अशी पहिलीच केस आढळून आली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा पूर्णपणे हादरून गेली आहे.

    दिल्ली : देशातील कोरोना बाधितांची संख्या काही प्रमाणात कमी होत असतानाच ब्लॅक फंगसचा धोका वाढताना दिसत आहे. ब्लॅक फंगस आजार जडलेल्या रुग्णांचा आकडा आता 5 हजार 500 वर पोहोचला आहे. या आजारामुळे आतापर्यंत सव्वाशेहून अधिक जणांचा जीव गेला आहे. त्यातच आता ब्लॅक फंगस थेट मेंदूवर वार करत असल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. गुजरातच्या सूरतमध्ये अशी पहिलीच केस आढळून आली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा पूर्णपणे हादरून गेली आहे.

    सूरतमध्ये एका 23 वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झाली. उपचार वेळेत मिळाल्याने तरुणाने कोरोनावर मात केली. मात्र त्यानंतर त्याला ब्लॅक फंगस आजार जडला. आतापर्यंत ब्लॅक फंगसमुळे फुफ्फुसं, डोळ्यांना धोका पोहोचत होता. मात्र आता ब्लॅक फंगस थेट मेंदूपर्यंत पोहोचला आहे. हा प्रकार पहिल्यांदाच पाहत असल्याचे उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले आहे. यामुळे डॉक्टरांनी रुग्णांना अधिक सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. रुग्णांनी एमआरआय स्कॅन करावे. कारण ब्लॅक फंगस मेंदूपर्यंत पोहोचल्याची माहिती एखाद्या व्यक्तीला भोवळ आल्यानंतर किंवा तो बेशुद्ध पडल्यानंतरचे समजते.