ममता बॅनर्जींना झटका; फेरमतमोजणी करण्याची मागणी निवडणूक आयोगाने फेटाळली

बंगालमधील नंदीग्राम मतदारसंघातून पराभूत झाल्यानंतर तृणमूल सुप्रीमो ममता बॅनर्जींना पुन्हा एकदा जबर झटका बसला आहे. जुन्या सहकाऱ्यानेच पराभव केल्याचे शल्य बोचल्यानंतर त्यांनी फेरमतमोजणी करण्याची केलेली मागणी निवडणूक आयोगाने फेटाळून लावली. तसेच रिटर्निग ऑफिसरचा निरअणय अंतिम असून केवळ हायकोर्टातच आव्हान दिले जाऊ शकते, असे आयोगाने म्हटले. दरम्यान नंदीग्राममध्ये रिटर्निग अधिकाऱ्यास सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे.

    कोलकाता : बंगालमधील नंदीग्राम मतदारसंघातून पराभूत झाल्यानंतर तृणमूल सुप्रीमो ममता बॅनर्जींना पुन्हा एकदा जबर झटका बसला आहे. जुन्या सहकाऱ्यानेच पराभव केल्याचे शल्य बोचल्यानंतर त्यांनी फेरमतमोजणी करण्याची केलेली मागणी निवडणूक आयोगाने फेटाळून लावली. तसेच रिटर्निग ऑफिसरचा निरअणय अंतिम असून केवळ हायकोर्टातच आव्हान दिले जाऊ शकते, असे आयोगाने म्हटले. दरम्यान नंदीग्राममध्ये रिटर्निग अधिकाऱ्यास सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे.

    सर्वच मतमोजणी टेबलवर एक मायक्रो ऑब्झर्व्हर होता आणि त्यांनी मतमोजणी प्रक्रियेत कोणताही घोळ झाल्याचे संकेत दिले नाही, असे आयोगाने स्पष्ट केले. सर्व राऊंडनंतर रिटर्निंग अधिकाऱ्याने सर्व मतांची मोजणी केली होती असेही आयोगाने म्हटले.

    निवडणुका संपताच राज्यात हिंसाचाराचे सत्र सुरू झाले असून वेगवेगळ्या ठिकाणी १२ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. या मुद्यावरून भाजपा आणि तृणमूल काँग्रेसमध्ये वादविवादही सुरू झाले असून दोन्ही पक्षांनी एकमेकांवर आरोप केले. भाजपाने सुरू असलेल्या हिंसाचारात ९ कार्यकर्त्यांचा मृत्यू झाल्याचा दावा केला.