महिंद्रा है तो मुमकिन है…,रेकॉर्डब्रेक पावसात गाडीचा सुटला ब्रेक ; व्हिडिओ पाहून आनंद महिंद्रा झाले आश्चर्यचकित..

एका यूजरने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये रस्त्यावर पावसाचे पाणी साचले असून या साचलेल्या पाण्यातून महिंद्राची बोलेरो कार वाहत जाताना दिसत आहे. एका अर्थाने रेकॉर्डब्रेक पावसात सुद्धा गाडीचा ब्रेक सुटला असून ती गाडी पाण्यावर चालताना दिसत आहे.

    देशातील अऩेक भागांत मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी वादळी पावसामुळे नद्यांना नाल्याचे स्वरूप आले आहे. यामध्ये कित्येक लोकांचं नुकसान झालं आहे. असाच एक रेकॉर्डब्रेक पाऊस गुजरातमध्ये झाला असून येथील काही रस्ते जलमय झाले आहेत. या जलमय रस्त्यांवरून एक महिंद्रा बोलेरो तरंगत जाताना दिसत आहे. सध्या या गाडीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून आनंद महिंद्रा देखील आश्चर्यचकित झाले आहेत.

    एका यूजरने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये रस्त्यावर पावसाचे पाणी साचले असून या साचलेल्या पाण्यातून महिंद्राची बोलेरो गाडी वाहत जाताना दिसत आहे. एका अर्थाने रेकॉर्डब्रेक पावसात सुद्धा गाडीचा ब्रेक सुटला असून ती गाडी पाण्यावर चालताना दिसत आहे.

    यूजरने हा व्हिडिओ शेअर करताना  गुजरात पोलीस, राजकोट कलेक्टर आणि महिंद्रा अँन्ड महिंद्राचे मालक आनंद महिंद्रा यांना टॅग करत ‘महिंद्रा है तो मुमकिन है’, असे कॅप्शन दिले आहे. त्यानंतर महिंद्रा अँन्ड महिंद्राचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडिओ पाहून स्वत: प्रतिक्रिया दिली आहे.

    आनंद महिंद्रा यांनी दिली प्रतिक्रिया…

    आनंद महिंद्रा यांनी यूजरच्या पोस्टला प्रतिक्रिया देत म्हणाले की, खरचं? एवढ्या भर पावसात हे दृश्य पाहून मी आश्चर्यचकित झालो आहे. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून नेटकऱ्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.