yogi adityanath and babaramdev

मेरठच्या चौधरी चरण सिंह विद्यापीठाचे(Meerut University) विद्यार्थी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ आणि रामदेब बाबा यांच्याविषयी अभ्यास करणार आहेत.

    अ‍ॅलोपॅथीला नाव ठेवणाऱ्या बाबा रामदेव(Baba Ramdev) यांना आता योगातील तत्वज्ञ मानून त्यांचा विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. बाबा रामदेव यांच्यासोबत योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath)यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा देखील आता अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे.

    मेरठच्या चौधरी चरण सिंह विद्यापीठाचे विद्यार्थी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ आणि रामदेब बाबा यांच्याविषयी अभ्यास करणार आहेत. विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाने यांचा अभ्यासक्रमात समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. या दोघांव्यतिरिक्त बशीर बद्र, कुवर बैचेन, जग्गी वासुदेव यांचाही समावेश अभ्यासक्रमात आहे.

    विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाने नव्या अभ्यासक्रमात योगी आदित्यनाथ यांनी लिहिलेल्या हठयोग या पुस्तकाबद्दल शिकवण्यात येणार आहे. या पुस्तकात योगी आदित्यनाय यांनी हठयोगाविषयी माहिती दिली आहे. योगींच्या पुस्तकाचे प्रकाशन गोरखनाथ ट्रस्टने केलं आहे. योगी यांचे विचार विद्यार्थ्यांना वेगळा रस्ता दाखवतील असं अभ्यास मंडळाचे म्हणणे आहे. त्यांच्या विचारांनी विद्यार्थ्यांना सक्षम बनण्याची संधी मिळेल.

    अभ्यास मंडळाने रामदेव यांच्या योगाभ्यास आणि योग चिकित्सा रहस्य या पुस्तकांचा अभ्यासक्रमात समावेश केला आहे. या पुस्तकाच्या कला शाखेच्या अभ्यासक्रमात समावेश केला आहे. कला शाखेच्या तत्वज्ञानाच्या विषयात आता प्रॅक्टिकल आणि थेअरी अभ्यास असणार आहे.

    राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२१- २२ नुसार अभ्यासक्रम मंडळाच्या झालेल्या बैठकीत नवीन अभ्यासावर शिक्कामोर्तब केलं आहे. आपल्या येणाऱ्या पिढीला भारतातील सर्व क्षेत्रातील समृद्ध वारश्याविषयी माहिती यातून माहिती मिळणार आहे. याचा विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे अशी माहिती डॉ. डीएन. सिंह यांनी दिली.