crime scene

एका १७ वर्षीय मुलाने मोबाईलवर गेम(Mobile Game) खेळू नको असं म्हणणाऱ्या आपल्या वडिलांची गळा दाबून हत्या(Boy Kills His Father) केली आहे.

    आजकाल लहान मुलांना मोबाईलचं व्यसन(Mobile Addiction) जडलं आहे. गेम खेळण्यासाठी मोबाईल मिळाला नाही तर ते विचित्र वागायला लागतात. अशीच एक घटना गुजरातमधील(Gujrat) सुरतमध्ये(Surat) घडली आहे. एका १७ वर्षीय मुलाने मोबाईलवर गेम(Mobile Game) खेळू नको असं म्हणणाऱ्या आपल्या वडिलांची गळा दाबून हत्या(Boy Kills His Father) केली आहे. मुलाला पोलिसांनी बालसुधारगृहात पाठवलं आहे.

    ही घटना सुरतमधील इच्छापोर पोलीस ठाणे हद्दीतील कवास गावात घडली आहे. मृत व्यक्ती बायको आणि मुलासह राहात होता. दरम्यान मंगळवारी त्याला त्याच्या पत्नी व मुलाने बेशुद्ध अवस्थेत शासकीय रुग्णालयात नेल असता त्या व्यक्तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

    बायकोने डॉक्टरांना सांगितलं की, आठ दिवसांपुर्वी नवरा बाथरूममध्ये पडला होता. तेव्हा त्यांना दुखापत झाली होती. मंगळवारी ते झोपले आणि उठलेच नाही. डॉक्टरांना संशय आल्याने त्यांनी शवविच्छेदन करायला सांगितले. शवविच्छेदन अहवालातून त्या व्यक्तीचा गळा आवळून खून करण्यात आल्याचे उघड झाले.

    पोलिसांनी मृत व्यक्तीच्या बायकोची आणि मुलाची चौकशी केल्यानंतर अनेक गोष्टींचा खुलासा झाला. मुलाने सांगितले की, मी कायम मोबाईलवर गेम खेळत असल्याने माझे वडील मला नेहमी रागावायचे. त्यामुळे मंगळवारी ते झोपे असताना त्यांचा गळा दाबला. १७ वर्षीय मुलाने पोलिसांसमोर आपला गुन्हा कबूल केल्यावर त्याची बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आलेली आहे. याविषयीची कायदेशीर कारवाई सुरु आहे.