गर्लफ्रेंडची समजूत काढण्यासाठी तो प्रेमवीर बनला वीरू, त्या ड्राम्यामुळे सगळ्यांनाच भरली धडकी

ग्रेटर नोएडा(Greater Noida) भागातला एक आफ्रिकी तरुण आपल्या गर्लफ्रेंडची समजूत काढायला चक्क शोलेमधला(Sholay Style) वीरु(Veeru) झाला. 

    आपल्या गर्लफ्रेंडची(Girlfriend) समजूत काढायला मुलं कोणत्याही थराला जातात. मात्र या पठ्ठ्याने तर वेगळ्याच अंदाजात आपल्या गर्लफ्रेंडची समजूत काढायचा प्रयत्न केला आहे. ग्रेटर नोएडा(Greater Noida) भागातला एक आफ्रिकी तरुण आपल्या गर्लफ्रेंडची समजूत काढायला चक्क शोलेमधला(Sholay Style) वीरु(Veeru) झाला.

    काल ग्रेटर नोएडा भागात एक तरुण आपल्या गर्लफ्रेंडची समजूत काढण्यासाठी एका अर्धवट बांधलेल्या इमारतीच्या बाराव्या मजल्यावर चढला आणि आत्महत्या करण्याची धमकी देऊ लागला. हा शोले स्टाईल ड्रामा तब्बल दोन तास सुरु होता. आजूबाजूला बरीच गर्दीही जमा झाली होती. शेवटी पोलीस आणि या तरुणाच्या मित्रांनी त्याची समजूत काढली आणि त्याला खाली उतरवलं.

    हा तरुण अंगाला देशाचा नागरिक आहे. त्याचं नाव एँटोनियो मुबाई असल्याची माहिती आजतकने दिली आहे. या तरुणाचं आपल्या गर्लफ्रेंडशी भांडण झालं होतं. तिची समजूत काढण्यासाठी तो या इमारतीच्या बाराव्या मजल्यावर चढून आत्महत्येची धमकी देत होता. हे सगळं पाहण्यासाठी बरीच गर्दी जमा झाली होती. आसपासच्या लोकांनी या घटनेची माहिती पोलिसांना कळवली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्याला समजावण्याचा प्रयत्न करु लागले. मात्र, पोलिसांना भाषेची अडचण होऊ लागली. त्यांची भाषा या युवकाला समजत नव्हती. शेवटी पोलिसांनी त्याच्या काही मित्रांना त्याला समजावून सांगण्याची विनंती केली.

    हा सगळा प्रकार दोन तास सुरु होता. पोलीस आणि या तरुणाचे मित्र वारंवार त्याला खाली येण्याची विनंती करत होते, समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होते. मात्र तो कोणाचंही ऐकायला तयार नव्हता. पोलीस त्याला पकडायला जाताच तो इमारतीवर लटकायचा. शेवटी मोठ्या मुश्किलीने पोलिसांनी त्याला नीट खाली उतरवलं.