Breakups are followed by rape allegations; Shocking statement of the chairperson of the women's commission

छत्तीसगढ : देशातील बहुतेक बलात्काराचे आरोप हे ब्रेकअपनंतर होतात. त्तीसगढच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा किरनमयी नायक यांनी हे धक्कादायक विधान केले आहे. छत्तीसगढमधील महिलांच्या शोषणाच्या मुद्द्यावर बोलत असताना त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

जर एखाद्या विवाहीत पुरुषाने अविवाहीत मुलीसोबत अफेयर केले तर आपण समजू शकतो की त्याने ती बाब तिच्यापासून लपवून ठेवली. या वेळेस बलात्काराचा आरोप योग्य आहे. पण, बहुतांश प्रकरणात मुलगी व मुलगा हे रिलेशनशिपमध्ये असतात. ते लिव्ह इन मध्ये राहत असतात. यानंतर जेव्हा ते वेगळे होतात. त्यावेळी मुलीकडून बलात्काराचा आरोप केला जातो असे नायक म्हणाल्या.

देशात बलात्काराच्या घटना वाढत आहेत. असे असताना महिला आयोगाच्या अध्यक्षांनी केलेले हे वक्तव्य बलात्कार पीडितेची खच्चीकरण करणारे असल्याची टीका होत आहे. नायक यांच्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला असून या प्ररकरणी त्यांनी माफी मागावी अशी मागणीही होत आहे.