bride entry on bullet with black goggle

एका लग्नात नवरीनं मंडपात काळा गॉगल (Bride with Black Goggle)घालून बुलेटवरून एंट्री(Bride Entry on Bullet) मारली.

    बरेली : आपलं लग्न (Special Marriage) खास असलं पाहिजे असं अनेकांना वाटतं, अशाच एका लग्नात नवरीनं मंडपात काळा गॉगल (Bride with Black Goggle)घालून बुलेटवरून एंट्री(Bride Entry on Bullet) मारली. हे दृश्य सगळेजण अवाक् झाले. नवरीचा भाऊ बुलेटवर बसून आपल्या लाडक्या बहिणीला मंडपात घेऊन आला.

    उत्तर प्रदेशच्या बरेलीमधील नवरीनं लग्नात मारलेल्या या एन्ट्रींची परिसरात चर्चा आहे. दरम्यान, बरेलीच्या सिकलापूर मोहल्ल्यात राहणाऱ्या या नंदिनीला एकूण सात भाऊ आहेत.या ७ जणांपैकी  पाच जण बॉडी बिल्डर आहेत.

    सात भावांची एकुलती एक बहीण असल्यानं तिच्या लग्नाची जोरदार तयारी त्यांनी केली होती. कोरोना काळात डीजे साऊड सिस्टम वाजवण्यास बंदी आहे, मात्र बहिणीच्या आनंदासाठी कमी आवाजात गाणी लावून सर्वांनी मौजमजा केली,  विशेष पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. सिकलापूरहून १ किलोमीटर अंतरावर असलेल्या आलमगिरीगंज येथून लग्नाची वरात निघाली होती आणि ती सिकलापूरला पोहोचल्यावर  काळा कुर्ता घातलेला तिचा भाऊ  बहिणीला बुलेटवरून घेऊन आला.