bridge collapsed at uttarakhand

ऋषिकेश डेहरादून मार्गावरील जाखन नदीवर बनलेला पूल(Bridge Between Rushikesh- Dehradun Collapsed) वाहून गेला.

    उत्तराखंडमध्ये(Uttarakhand) मुसळधार पावसाने(Heavy Rain) जनजीवन विस्कळीत झालं आहे. पावसामुळे नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. हवामान खात्यानं(Climate Department) उत्तराखंडमधील नैनीताल, चंपावत, उधमसिंह नगर, बागेश्वर आणि पिछोरागड या जिल्ह्यात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.ऋषिकेश डेहरादून मार्गावरील जाखन नदीवर बनलेला पूल(Bridge Between Rushikesh- Dehradun Collapsed) वाहून गेला. या पूलावरील दोन गाड्या वाहून गेल्या आहेत.  पुलाचा पिलरही कोसळला आहे.

    प्रवाहाचा वेग जास्त होता. त्यामुळे जाखन नदीवरील पूल वाहून गेला. पुलावरील काही गाड्या वाहून गेल्या पण काही मोटारसायकस्वार बचावले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. पोलिसांनी पुलाच्या दिशेने येणारी वाहतूक रोखली आहे. या दुर्घटनेमुळे ऋषिकेशचा राजधानी डेहरादून आणि जौलीग्रांट विमानतळाशी संपर्क तुटला आहे.