हाच तो बोगदा
हाच तो बोगदा

कठुआ (Kathuaa).  भारत-पाकिस्तान सीमेवरील कठुआ येथील हिरानगर सेक्टरमध्ये बीएसएफच्या जवानांना एक १५० मीटर लांबीचा बोगदा आढळून आला आहे. या बोगद्यामुळे पुन्हा एकदा पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून भारतात घुसखोरी करण्यासाठी केले जात असलेले प्रयत्न, जगासमोर उघड झाले आहेत.

बीएसएफच्या अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेजवळ एक बोगदा आढळून आला आहे. हा बोगदा जवळपास १५० मीटर लांब असून, यामधून काही सिमेंटची पोती देखील हस्तगत करण्यात आली आहे. हे सिमेंट पाकिस्तानमधील कराची येथील असल्याचे दिसून आले आहे. अशी देखील माहिती समोर येत आहे की, हा बोगदा पाकिस्तानच्या पोस्टच्या अगदी समोरूनच खोदला गेला आहे.