नियम डावलून भाजपकडून कलश यात्रेचे आयोजन, गुन्हा दाखल

मध्य प्रदेशमध्ये(madhya pradesh) विधानसभा पोटनिवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत या निवडणुकीचा (election) प्रचार करताना भाजपकडून कोरोनासंदर्भातल्या नियमांचे उल्लंघन झाले असल्याचे समोर आले आहे. इंदूरमधील सांवेर मतदार संघामध्ये हा प्रकार घडला आहे. या भागामध्ये कलश यात्रेचे(kalash yatra) आयोजन करण्यात आले होते. इथल्या वेगवेगळ्या ठिकाणी भाजपा(bjp) नेत्यांच्या समर्थनासाठी कलश यात्रा आयोजित होत आहेत. इंदूरमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना या यात्रांमध्ये गर्दी दिसून येत आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नाहीये. तसेच मास्कही कुणी वापरताना दिसत नाही. त्यामुळे पोलिसांनी या प्रकाराची दखल घेऊन कारवाई केली आहे.

सोशल मीडियावर या कलश यात्रेचे फोटो व्हायरल झाल्यावर पोलीस जागे झाले. पोलिसांनी या प्रकरणामध्ये माजी आमदार आणि भाजप जिल्हाध्यक्ष राकेश सोनकर यांच्यासह ६ जणांच्या विरोधात ३ वेगवेगळ्या पोलीस स्थानकांमध्ये गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळाली आहे.

मंगळवारी दाखल करण्यात आलेल्या या एफआयआरनंतर काल सांवेर भागामधील रालामंडल, झलारिया, निगनोटी, बूढी बरलाई, पीर कराडियासहीत १५ वेगवेगळ्या ठिकाणी नर्मदा कलश यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या कलश यात्रा तुलसी सिलवाट यांच्या समर्थनार्थ काढण्यात आल्याचे समजते.या कलश यात्रांचे फोटो, व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.  इंदूरचे पोलीस उपनिरिक्षक हरिनारायण चारी मिश्री यांनी या यात्रा प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. तपास पूर्ण झाल्यानंतर या प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांविरोधात कारवाई केली जाणार आहे.