हाथरस प्रकरणातील आरोपींविरोधात सीबीआयकडून गुन्हा दाखल, चौकशीसाठी केली समितीची नियुक्ती

हाथरसमधील सामूहिक बलात्कार व हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे (CBI) सोपवण्यात आला. तपास हाती घेतल्यानंतर सीबीआयनं प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, तपासासाठी समितीही नियुक्त ( appoints committee) केली आहे.

उत्तर प्रदेशातील (UP) हाथरसमध्ये (Hathras case) मागास समुदायातील मुलीचा सामूहिक बलात्कार करून हत्या करण्यात आली होती. या घटनेचे तीव्र पडसाद देशभरात उमटले. विरोधकांकडून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या सरकारवर प्रचंड टीका झाली. त्याचबरोबर सरकारकडून झालेल्या दडपशाहीचाही विरोध केला गेला. परंतु आता मिळालेल्या माहितीनुसार, हाथरसमधील सामूहिक बलात्कार व हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे (CBI) सोपवण्यात आला. तपास हाती घेतल्यानंतर सीबीआयनं प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, तपासासाठी समितीही नियुक्त ( appoints committee) केली आहे.

हाथरस प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होण्यासाठी याचा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी केली जात होती. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली होती. मागणीची दखल घेत योगी सरकारनं हाथरस प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची शिफारस केली होती.

केंद्रानं शनिवारी सीबीआयकडे तपास सोपवला. त्यानंतर सीबीआयनं या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, चौकशी टीमही नियुक्त केली आहे. हाथरस प्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर सीबीआयकडून माहिती देण्यात आली. एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास सुरू करण्यात आला आहे, असं सीबीआयनं म्हटलं आहे.