व्यापमं घोटाळ्यासंदर्भात सीबीआयचे आरोपपत्र दाखल

मध्यप्रदेशातील बहुचर्चित व्यापमं घोटाळ्यातील १८ आरोपींविरोधात न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले आहे. व्यापमंमध्ये झालेल्या परिवहन आरक्षक भरती परीक्षा घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने १८ नव्या आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. तपास संस्थेने सर्व आरोपींना न्यायालयात हजर होण्यासाठी समन्स बजावले होते, मात्र एकही आरोपी कोर्टात हजर झाला नाही. यामुळे व्यापमं घोटाळ्याशी संबंधित प्रकरणांची सुनावणी करणाऱ्या सीबीआयच्या विशेष न्यायाधीश एस.बी. साहू यांनी सर्व १८ आरोपींविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. एसटीएफने यापूर्वी २६ आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. सीबीआय चौकशीत १८ नवी नावे समोर आली आहे. आता याप्रकरणी एकूण ४४ जणांना आरोपी करण्यात आले आहे.

  • १८ आरोपींविरोधात अटक वॉरंट जारी

भोपाळ (Bhopal).  मध्यप्रदेशातील बहुचर्चित व्यापमं घोटाळ्यातील १८ आरोपींविरोधात न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले आहे. व्यापमंमध्ये झालेल्या परिवहन आरक्षक भरती परीक्षा घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने १८ नव्या आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. तपास संस्थेने सर्व आरोपींना न्यायालयात हजर होण्यासाठी समन्स बजावले होते, मात्र एकही आरोपी कोर्टात हजर झाला नाही. यामुळे व्यापमं घोटाळ्याशी संबंधित प्रकरणांची सुनावणी करणाऱ्या सीबीआयच्या विशेष न्यायाधीश एस.बी. साहू यांनी सर्व १८ आरोपींविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. एसटीएफने यापूर्वी २६ आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. सीबीआय चौकशीत १८ नवी नावे समोर आली आहे. आता याप्रकरणी एकूण ४४ जणांना आरोपी करण्यात आले आहे.

व्यापमं घोटाळा केस

सीबीआयचे विशेष सरकारी वकील सतीश दिनकर आणि एस.के. पांडे यांनी याबाबत सांगितले की, एसटीएफने परिवहन आरक्षक भरती परीक्षा-२०१२ मध्ये चुकीच्या पद्धतीने निवड करण्यात आलेल्या उमेदवारांबाबत मिळालेल्या २० तक्रारींची चौकशी केली होती. व्यापमंचे अधिकारी/कर्मचारी पंकज त्रिवेदी, नितिन महिन्द्रा, अजय सेन आणि सी.के. मिश्रा यांनी लाच घेऊन अनेक उमेदवारांना उत्तीर्ण केले, असे या चौकशीत निष्पन्न झाले. तक्रारींची चौकशी सुरू असताना भोपाल व्यापमंमधून परिवहन आरक्षक भरती परीक्षेत निवड करण्यात आलेल्या एकूण ३२७ उमेदवारांची मूळ ओएमआर पत्रिका जप्त करून चौकशीसाठी पाठविण्यात आली होती.