चाकोंचा काँग्रेसला घटस्फोट; निवडणुकीपूर्वी काँग्रेसला केरळमध्ये झटका

केरळ विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा विजय व्हावा ही सर्वांचीच इच्छा आहे परंतु पक्षातील गटबाजीमुळे हे शक्य नाही. गटबाजीला लगाम कसण्यासंदर्भात अनेकदा पक्ष नेतृत्वासोबत चर्चा केली परंतु त्यांनी लक्षच दिले नाही. गटबाजीबात ए आणि आय ग्रुप तयार करण्याचाही प्रस्ताव दिला होता परंतु त्याकडेही दुर्लक्षच करण्यात आले. या आपत्तीसाठी काँग्रेस पक्ष मूक साक्षीदार आहे. त्यामुळेच काँग्रेसच्या टीमसोबत काम करणेही अशक्य होते.- पी.सी. चाको

  दिल्ली: एकीकडे पक्षाला अध्यक्षपद नाही, त्यातच जी-23 नेत्यांनी स्थापन केलेला वेगळा गट यामुळे तसेच एकामागोमाग एक नेत्यांनी पक्षास रामराम केल्यामुळे बेजार झालेल्या काँग्रेस पक्षाला पुन्हा एकदा जबर झटका बसला आहे. काँग्रेसमधून पुन्हा एकदा एका नेत्याची विकेट पडली आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते पी. सी. चाको यांनी राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे. स्वत: चाको यांनी याबाबतची घोषणा केली व राजीनामा पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांना पाठविल्याची माहिती दिली. निवडणुकीपूर्वीच काँग्रेसला हा झटका मानला जात आहे. तिकीट वाटपावरही त्यांनी नाराजी दर्शविली आहे.

  केरळ विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा विजय व्हावा ही सर्वांचीच इच्छा आहे परंतु पक्षातील गटबाजीमुळे हे शक्य नाही. गटबाजीला लगाम कसण्यासंदर्भात अनेकदा पक्ष नेतृत्वासोबत चर्चा केली परंतु त्यांनी लक्षच दिले नाही. गटबाजीबात ए आणि आय ग्रुप तयार करण्याचाही प्रस्ताव दिला होता परंतु त्याकडेही दुर्लक्षच करण्यात आले. या आपत्तीसाठी काँग्रेस पक्ष मूक साक्षीदार आहे. त्यामुळेच काँग्रेसच्या टीमसोबत काम करणेही अशक्य होते.
  – पी.सी. चाको

  महान पक्ष, पण परंपराच नाही
  विशेष म्हणजे १४० सदस्य असलेल्या केरळ विधानसभेसाठी ६ एप्रिल रोजी निवडणुका होणार आहेत. चाको केरळातील त्रिशूर लोकसभा मतदासंघाचे खासदारही होते. दरम्यान, काँग्रेस एक महान पक्ष आहे पंरतु या पक्षात महान परंपराच नाही अशी टीकाही त्यांनी केली. काँग्रेसचा सदस्य असणे सन्मानजनक आहे परंतु आज केरळात कोणताही व्यक्ती काँग्रेसचा सदस्यच होण्यास इच्छुक नाही, अशी व्यथाही त्यांनी व्यक्त केली.

  २०१३ मध्येही दिला होता इशारा

  उल्लेखनीय असे की चाको यांनी २०१३मध्येच काँग्रेसच्या पतनास प्रारंभ झाल्याचा इशारा दिला होता. त्यावेळी दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित होत्या आणि त्याचवेळी आम आदमी पक्षाचाही उदय झाला होता. त्यांच्या या विधानावरून वादही झाला होता. चाको १९८० मध्ये सर्वप्रथम पिरावम विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर विजयी होणारे पहिलेच उमेदवार ठरले होते. त्यानंतर ते नायक सरकारमध्ये मंत्रीही झाले होते.