chandrababu naidu

आंध्रप्रदेशचे (andhra pradesh)माजी मुख्यमंत्री आणि टीडीपी प्रमुख चंद्रबाबू नायडू (notice to chandrabau naidu) यांच्या अमरावती जमीन घोटाळा(amravati land scam) प्रकरणातील अडचणी वाढताना दिसत आहेत.

    हैदराबाद:  आंध्रप्रदेशचे (andhra pradesh)माजी मुख्यमंत्री आणि टीडीपी प्रमुख चंद्रबाबू नायडू (notice to chandrabau naidu) यांच्या अमरावती जमीन घोटाळा(amravati land scam) प्रकरणातील अडचणी वाढताना दिसत आहेत. या प्रकरणात सीआयडीने त्यांना नोटीस(CID notice to chandrababu naidu) बजावली आहे. याशिवाय माजी राज्यमंत्री पोंगुरू नारायण यांनाही नोटीस बजावण्यात आली आहे. दोघांनाही या प्रकरणाच्या चौकशीत सहभागी होण्यास सांगण्यात आले आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, त्यांना २३ मार्च रोजी चौकशीसाठी बोलविण्यात आले आहे. राज्यातील ६ सीआयडी अधिकारी चंद्रबाबू नायडू यांच्या हैदराबाद येथील निवासस्थानी पोहोचले आणि त्यांना चौकशीत सहभागी होण्याची नोटीस दिली. फौजदारी प्रक्रिया संहिता कलम ४१ अन्वये नायडू यांना ही नोटीस बजावण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

    सीआयडीने चंद्रबाबू नायडू यांच्याविरोधात भारतीय दंड संहितेनुसार, कलम १६६, १६७ आणि २१७ अंतर्गत तक्रार नोंदविण्यात आली आहे. चंद्रबाबू नायडू यांना २३ मार्च रोजी चौकशीत सहभागी होण्यास सांगितले आहे. याशिवाय सीआयडीने शैक्षणिक संस्था गट चालविणारे मुख्य व्यापारी पोंगुरू नारायण यांनाही नोटीस बजावली आहे. सीआयडीने चंद्रबाबू नायडू यांच्यांसह पोंगुरू नारायण यांच्याविरुद्ध एससी / एसटी अत्याचाराचा गुन्हाही दाखल केला आहे.