twitter handle

मोदींना आदर्श मानणारे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ(yogi Adityanath) आणि सरकारच्या इतर ट्विटर हँडल्सवरून(Twitter Handle) पंतप्रधान नरेंद्र मोदींचा(Narendra Modi`s Photo Missing) फोटो गायब आहे. विरोधी पक्षांनीही यावरून भाजपवर निशाणा साधला आहे.

  भाजप योगींना(Yogi) कमी समजत असली तरी भाजपच्या उत्तर प्रदेशच्या ट्विटर हँडलवरून (UP BJP Twitter Handle) योगी किती शक्तिशाली आहेत याचा अंदाज येतो. उत्तर प्रदेश भाजपा प्रभारी राधा मोहन सिंह आणि राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्या भेटीमागे खूप मोठे गुपित दडले आहे.राजकीय तज्ञ याला वादळाची नांदी म्हणत आहेत.

  या भेटीवरून सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे. मोदींना आदर्श मानणारे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि सरकारच्या इतर ट्विटर हँडल्सवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो गायब आहे. विरोधी पक्षांनीही यावरून भाजपवर निशाणा साधला आहे.

  उत्तर प्रदेश भाजपच्या ट्विटर हँडलवर जो बॅनर लावण्यात आला आहे त्यात अध्यक्ष स्वतंत्र देव सिंह आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत दोन्ही डेप्युटी सीएम केशव प्रसाद मौर्य आणि दिनेश शर्मा यांचा फोटो आहे. मात्र सकाळी ११ वाजता हँडलवर एका व्हिडिओमध्ये नरेंद्र मोदींचा उल्लेख आहे.

  आश्चर्याची बाब म्हणजे ज्या ज्या राज्यांमध्ये भाजपचे सरकार आहे तिथे तिथे राज्याच्या भाजपच्या ट्विटर हँडलवर मोदींचा फोटो आहे. मध्यप्रदेश, गुजरात, हिमाचल प्रदेश आणि हरियाणामध्येही भाजपच्या ट्विटर हँडलवर मोदींचा फोटो आहे. गोव्याच्या ट्विटर हँडलवर तर मोदींसोबत शहांचाही फोटो आहे.

  रविवारी जेव्हा उत्तर प्रदेशचे प्रभारी राधा मोहन लखनऊ दौऱ्यावर होते तेव्हा राधा मोहन आणि प्रदेश अध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांना उत्तर प्रदेशमधील मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल विचारण्यात आले. तेव्हा स्वतंत्र देव सिंह यांनी योगींचे गुणगान केले.मुख्यमंत्री मेहनती असून २४ तास काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.

  उत्तर प्रदेशमध्ये पुढच्या वर्षी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा खूप सक्रीय झाले आहेत. मात्र योगी आदित्यनाथ यांच्यासोबत त्यांचे काही बिनसले तर नाही ना ? याविषयी चर्चा सुरु आहे. योगींच्या वाढदिवसालाही मोदी आणि शहा यांनी शुभेच्छा देणे टाळले त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.