मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच चरणजित सिंह चन्नी म्हणतात ‘किसानों पर आंच आई तो गला काटकर दे दूंगा’

“आमचे सरकार शेतकऱ्यांचे सरकार आहे. शेतकऱ्यांचे काही नुकसान झाले तर मी माझा गळा पुढे करेन. शेतकरी बुडला तर देश बुडेल, अर्थव्यवस्था बुडेल. शेतकरी सुखी असतील तरच पंजाब सुखी होईल. पंजाबचा शेतकरी दुबळा होऊ देणार नाही. केंद्र सरकारने तिन्ही कृषी कायदे Three Farm Laws  मागे घ्यावेत.”

    चरणजित सिंह चन्नी Charanjit Singh Channi यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची Punjab CM शपथ घेतली. यावेळी काँग्रेसचे नेते राहुल गांधी Rahul Gandhi, पंजाब काँग्रेसचे प्रभारी हरीश रावत Harish Rawat आणि पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू Navjot Singh Sidhu उपस्थित होते. शपथ घेतल्यानंतर चन्नी म्हणाले की, “जर शेतकऱ्यांवर कोणतं संकट आलं तर मी माझा गळा पुढं करेन.”

    पंजाबचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी यांनी शपथ घेताच जर शेतकऱ्यांवर कोणतं संकट आलं तर मी माझा गळा पुढं करेन हे केलेलं वक्तव्य योग्य आहे, असं वाटतं का?

    View Results

    Loading ... Loading ...

    ते म्हणाले की, “आमचे सरकार शेतकऱ्यांचे सरकार आहे. शेतकऱ्यांचे काही नुकसान झाले तर मी माझा गळा पुढे करेन. शेतकरी बुडला तर देश बुडेल, अर्थव्यवस्था बुडेल. शेतकरी सुखी असतील तरच पंजाब सुखी होईल. पंजाबचा शेतकरी दुबळा होऊ देणार नाही. केंद्र सरकारने तिन्ही कृषी कायदे Three Farm Laws  मागे घ्यावेत.”

    चरणजित सिंह चन्नी हे पंजाबचे १७ ने मुख्यमंत्री बनले आहेत. पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी त्यांना गोपनियतेची शपथ दिली आहे. राजभवनात हा सोहळा पार पडला. या शपथविधी सोहळ्याला मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी यांच्या व्यतिरिक्त, सुखजिंदर सिंह रंधावा आणि ओम प्रकाश सोनी यांनी उपमुख्यमंत्री म्हणून मंत्री म्हणून शपथ घेतली आहे. यातील एक चेहरा हिंदू आहे आणि दुसरा चेहरा शीख समुदायाचा आहे.

    चरणजीत सिंह चन्नी दलित सिख (रामदसिया सिख) समुदायातून येतात आणि रूपनगर जिल्ह्यातील चमकौर साहिब विधानसभा क्षेत्रातून निवडुन आलेले आमदार आहेत. अमरिंदर सरकारमध्ये तांत्रिक शिक्षण आणि औद्योगिक प्रशिक्षण, रोजगार निर्मिती आणि प्रशिक्षण आणि पर्यटन आणि संस्कृती व्यवहार विभागाची जबाबदारी सांभाळली होती. २००७ साली पहिल्यांदा ते या विधामसभा मतदार संघातून निवडून आले होते आणि त्यानंतर सलग आमदारकी जिंकले होते. २०१५-२०१६ मध्ये जेव्हा पंजाबमध्ये शिरोमणि अकाली दल आणि भाजपा युतीची सत्ता होती तेव्हा ते विरोधीपक्ष नेते होते.