baba ramdev

इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) पदाधिकाऱ्यांनी केलेल्या तक्रारीवरून रायपूर पोलिसांनी योगगुरु रामदेव यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आयएमएचे पदाधिकारी डॉ. राकेश गुप्ता आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी रामदेव यांच्याद्वारे वैद्यकीय अधिकारी आणि कोरोना संक्रमण काळात वापरण्यात येणाऱ्या औषधांबाबत वादग्रस्त विधाने करून जनतेत संभ्रम पसरविल्याचा आरोप तक्रारीत केला आहे.

    रायपूर : इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) पदाधिकाऱ्यांनी केलेल्या तक्रारीवरून रायपूर पोलिसांनी योगगुरु रामदेव यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आयएमएचे पदाधिकारी डॉ. राकेश गुप्ता आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी रामदेव यांच्याद्वारे वैद्यकीय अधिकारी आणि कोरोना संक्रमण काळात वापरण्यात येणाऱ्या औषधांबाबत वादग्रस्त विधाने करून जनतेत संभ्रम पसरविल्याचा आरोप तक्रारीत केला आहे.

    रामदेव यांनी संभ्रमावस्था निर्माण केल्यामुळे आधुनिक वैद्यकीय उपचारांमुळे 90 टक्के बरे झालेल्या रुग्णांच्या जीवाला धोकाही होऊ शकतो, असे तक्रारीत नमूद केले आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी भादंविचे कलम आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियमांच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

    हे सुद्धा वाचा