चार दिवसांच्या छटपूजेला आजपासून सुरुवात, गंगास्नानासाठी भाविकांचा उत्साह

धान्याची पूजा करणे आणि त्या धान्याचे गोड पदार्थ तयार करून देवाला अर्पण करणे, असे आजच्या दिवसाच्या पूजेचे स्वरूप असते. यासाठी सुरुवातीला धान्य धुऊन त्याची पूजा केली जाते. त्यानंतर त्या धान्यापासून गोडाधोडाचे पदार्थ बनवले जातात आणि देवाला त्याचा नैवेद्य दाखवण्यात येतो. आजच्या दिवशी गंगा नदीत केलेले स्नान पवित्र मानले जाते.

बिहारमध्ये आजपासून (बुधवार) छटपूजेला सुरुवात झाली आहे. मोठ्या उत्साहात हा सण उत्तरेतील राज्यांमध्ये साजरा केला जातो. आजपासून या सणाला सुरुवात झाली आहे.

धान्याची पूजा करणे आणि त्या धान्याचे गोड पदार्थ तयार करून देवाला अर्पण करणे, असे आजच्या दिवसाच्या पूजेचे स्वरूप असते. यासाठी सुरुवातीला धान्य धुऊन त्याची पूजा केली जाते. त्यानंतर त्या धान्यापासून गोडाधोडाचे पदार्थ बनवले जातात आणि देवाला त्याचा नैवेद्य दाखवण्यात येतो.

आजच्या दिवशी गंगा नदीत केलेले स्नान पवित्र मानले जाते. यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी गंगा नदीच्या दुतर्फा अंघोळीसाठी भाविक गर्दी करताना दिसतात.

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारची खबरदारी घेऊनच छटपूजा करण्याच्या सूचना प्रशासनानं दिल्या आहेत. कुठेही गर्दी होऊ नये आणि कोरोना संसर्गाला वाव मिळू नये, याची खबरदारी घेतली जात आहे.

छटपूजेचा हा उत्सव एकूण चार दिवस चालणार आहे. आजच्या पहिल्या दिवसाला विशेष महत्त्व आहे. त्यामुळं सकाळपासूनच भाविक गंगा आणि इतर नद्यांच्या काठांवर जमून नदीत डुबकी मारताना दिसत आहेत.