Chicken biryani outside the temple; Conflict between Jain-Muslims over biryani handcart

उत्तरप्रदेशच्या बागपत जिल्ह्यातील बडगाव या गावात धार्मिक कारणावरून जैन आणि मुस्लीम लोकांमध्ये जोरदार संघर्ष झाला. दोन्ही गटांत मारामारी झाल्याने येथे तणाव निर्माण झाला असून, गावात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. गावातील जैन समाजाच्या वतीने त्रिलोक तीर्थ धाम जैन मंदिरात एका धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त मंदिराबाहेर एका हातगाडीवर ‘शिकंजी’ (खाद्यपदार्थ) विक्री करण्यात येत होती.

    मेरठ : उत्तरप्रदेशच्या बागपत जिल्ह्यातील बडगाव या गावात धार्मिक कारणावरून जैन आणि मुस्लीम लोकांमध्ये जोरदार संघर्ष झाला. दोन्ही गटांत मारामारी झाल्याने येथे तणाव निर्माण झाला असून, गावात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. गावातील जैन समाजाच्या वतीने त्रिलोक तीर्थ धाम जैन मंदिरात एका धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त मंदिराबाहेर एका हातगाडीवर ‘शिकंजी’ (खाद्यपदार्थ) विक्री करण्यात येत होती.

    या गाडीवर लावण्यात आलेला ‘जैन शिकंजी’चा कागदी बॅनर एका मुलाने अनावधानाने फाडला. तेव्हा त्या गाडीवरील मूळ ‘चिकन बिर्याणी’चे बॅनर दिसून आले. ही बाब लक्षात येताच जैन समाजातील लोकांनी त्यावर आक्षेप घेतला आणि ही हातगाडी तिथून हटवण्यास सांगितली. ही हातगाडी पूर्वी बिर्याणी विकण्यासाठी वापरली जात होती. ती कार्यक्रमादरम्यान शिकंजी विकण्यासाठी एका मुस्लीम व्यक्तीने भाड्याने घेतली होती.

    शाकाहाराचा पुरस्कार करणाऱ्या जैन लोकांना ही गाडी चिकन बिर्याणीची आहे, हे समजताच धक्का बसला आणि त्यांनी त्यावर जोरदार आक्षेप घेतला. मात्र यावर त्या मुस्लीम विक्रेत्याने आपल्या समाजातील लोकांना बोलावून आणले आणि बसमधून जात असलेल्या जैन समाजाच्या भाविकांवर हल्ला केला, असा आरोप जैन समाजाच्या लोकांनी केला आहे. यावेळी झालेल्या हाणामारीत जैन समाजाच्या दोन जणांना किरकोळ जखमा झाल्या आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.