काळानुसार पक्षातील जबाबदाऱ्या बदलत राहतात, मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचे मोठे विधान

26 डिसेंबर 2017 रोजी रूपाणी यांनी दुसऱ्यांदा गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. भाजपने गुजरातमध्ये 182 पैकी 99 जागा जिंकून बहुमत मिळवले. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत रुपाणी यांची विधिमंडळ पक्षाचे नेते आणि नितीन पटेल यांची उपनेते म्हणून निवड करण्यात आली.

    गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांसमोर सांगितलं की, काळानुसार पक्षातील जबाबदाऱ्या बदलत राहतात. पक्षात ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. मला पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळायला दिली, हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे.

    पुढे त्यांनी सांगितलं की, जे.पी. नड्डा जी यांचे मार्गदर्शन देखील माझ्यासाठी अभूतपूर्व आहे. आता मला जी काही जबाबदारी मिळेल ती मी पार पाडीन. मला जी जबाबदारी देण्यात आली होती. ती मी पार पाडली आहे. आम्ही नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली राज्याच्या निवडणुका लढतो आणि 2022 च्या निवडणुकाही त्यांच्या नेतृत्वाखाली लढल्या जातील.