Child leaves elderly disabled mother in forest: Two days without food and water for fear of ferocious animals; Tears welled up in the eyes of those who rushed to her aid

आपल्या वृद्धापकाळात जन्माला घातलेली मुलं आपल्याला आधार देतील, अशी प्रत्येक आई-बापांची किमान अपेक्षा होते. पण मुलं मोठी होतात, आणि त्यांना सख्खे आई बाप ओझं वाटू लागतात. आई-बापांच्या आशा फोल ठरतात. राजस्थानातील कोटामध्ये अशीच एक भयंकर घटना समोर आली आहे. ज्यात एका नालायक मुलाने आपल्या ७० वर्षांच्या अपंग आईला घरापासून १० किलोमीटर अंतारवर असलेल्या जंगलात सोडून दिले. दोन दिवस बिचारी ही माऊली त्या घनदाट जंगलात न खाता पिता पडून राहिली. या माऊलीला पायी चालताही येत नाही, अशा आईचा त्रास होई लागल्याने तिच्या सख्ख्या मुलाने हे भयंकर कृत्य केले.

    कोटा : आपल्या वृद्धापकाळात जन्माला घातलेली मुलं आपल्याला आधार देतील, अशी प्रत्येक आई-बापांची किमान अपेक्षा होते. पण मुलं मोठी होतात, आणि त्यांना सख्खे आई बाप ओझं वाटू लागतात. आई-बापांच्या आशा फोल ठरतात. राजस्थानातील कोटामध्ये अशीच एक भयंकर घटना समोर आली आहे. ज्यात एका नालायक मुलाने आपल्या ७० वर्षांच्या अपंग आईला घरापासून १० किलोमीटर अंतारवर असलेल्या जंगलात सोडून दिले. दोन दिवस बिचारी ही माऊली त्या घनदाट जंगलात न खाता पिता पडून राहिली. या माऊलीला पायी चालताही येत नाही, अशा आईचा त्रास होई लागल्याने तिच्या सख्ख्या मुलाने हे भयंकर कृत्य केले.

    दोन दिवस ती महिला त्या जंगलात, हिंस्त्र पाण्याच्या परिसरात पडून होती, पण तिने जन्म दिलेल्या मुलाला आई कशी असेल, हे जाऊन पाहावेसेही वाटले नाही. मुलाने हे कृत्य केले असले तरी, त्या माऊलीला मात्र आपला मुलगा आपल्याला घ्यायला नक्की येईल, असे वाटत होते. तिच्या आईच्या ह्रद्याचा नात्याचा हा आशावाद प्रत्यक्षात मात्र आला नाही. मुलानी केलेल्या या दृष्कृत्याने माणुसीकरचा विश्वास उडेल , असे वाटत असतानाच पुढे जे घडले ते फारच आश्चर्यकारक होते.

    याच जंगलात गुरे चारण्यासाठी जात असलेल्या चौथमल गुर्जर यांना एक महिला बेसहाय अवस्थेत पडल्याची माहिती मिळाली, त्यानंतर तिच्यासाठी खाण्यापिण्याच्या वस्तू घून ते घटनास्थळी पोहचले. या महिलेची परिस्थिती पाहिल्यावर त्यांच्या डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहिले नाहीत.

    ही महिला चालू शकत नाही, तिला ज्या ठिकाणी सोडून दिले होते, त्या ठिकाणापासून रांगत ती अर्धा किलोमीटर पुढे आली होती. रांगत हे जंगल पार करु शकून, अशी आशा त्या बिचाऱ्या माऊलीला वाटत असावी. तिच्याकडे ना पिण्यासाठी पाणी होते ना जिवंत राहण्यासाठी अन्न होते. दोन दिवसांपूर्वी पाऊस झाला होता. जंगलात खड्ड्यांमध्ये साचलेले पाणी पिवून ती दोन दिवस जिवंत राहिली असावी, अशी शक्यता या महिलेला वाचवणाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

    जंगलात पोहचल्यावर वाचवणाऱ्यांनी या महिलेला पाणी दिले आणि अन्नही दिले. यावेळी त्या महिलेने, ती तिच्या मुलासोबत रानपूर परिसरात एका गावात राहत असल्याची माहिती दिली. दोन दिवसांपूर्वी तिचा मुलगा रतन तिला या अवस्थेत जगलात सोडून गेला होता. जाताना त्याने सांगितले होते की तो परत येईल, दोन दिवसांनंतरही रतन आपल्याला घ्यायला परत येईल, असा भाबडा आशावाद या माऊलीला होता. तो नक्की परत येईल, असे ती त्या महिलेला मदत करणाऱ्या सगळ्यांना सांगत होती.

    चौथमल आणि त्यांच्या साथीदारांनी तिला पाठीवर उचलून गाडीवर ठेवले आणि तिला आपल्या गावात घेऊन आले. तिच्या मुलाशी संपर्क करता यावा यासाठी रानपूर परिसरात शोधही सुरु केला.

    तीचा मुलगा रतन हा मजुरीचे काम करतो, आणि त्याला दारु पिण्याचे व्यसन असल्याचे समोर आले आहे. रानपूरच्या सरंपचांशी संपर्क साधून चौथमल यांनी या महिलेला तिच्या घरी पोहचवले, इतकेच नाही तर तिला जंगलात सोडणाऱ्या रतनलालची चांगलीच कान उघाडणीही केली. यावेळी दोघांमध्ये धक्काबुक्कीही झाली. तिला जंगलात सोडल्याचे मान्य करण्यासच तयार नव्हता, तीच कुणाला न सांगता निघून गेली, असा कांगावा करण्याचाही त्याने प्रयत्न केला. एवढे सगळे झाल्यानंतरही ती महिला तिच्या मुलाचीच बाजू घेत होती. आईची ममता काय असू शकते, याचं याहून चांगलं उदाहरण सापडणे कठीणच म्हणावे लागेल.