कोरोना संक्रमित पत्नी व मुलीच्या देखभालीसाठी सुट्टी न मिळाल्याने सर्कल अधिकाऱ्याने दिला थेट राजीनामा

मुलीची काळजी घेणे जास्त गरजेचे असल्याने सोनकर यांनी ताबडतोब एसएसपींसोबत चर्चा केली आणि त्यांना या संपूर्ण परिस्थितीबाबत माहिती दिली. त्यांना यासाठी सुट्टीही मागितली मात्र त्यांची नियुक्ती २ आणि ३ मेपर्यंत पंचायत निवडणुकीच्या मतमोजणी केंद्रावर करण्यात आली. याच कारणामुळे मुलीच्या देखभालीसाठीही सुट्टी मिळत नसल्याने नकर यांनी थेट राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.

    लखनऊ: देशात सर्वत्र कोरोना रुग्ण संख्येत सातत्याने वाढ होत आहे. या स्थितीही फ्रंट लाईन वर्कर म्हणून संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी डॉक्टर आणि पोलीस दिवसरात्र काम करत आहेत. मात्रत कुटुंबातच संसर्ग ओढवलेल्या पाहताना कुटुंबासाठी वेळ मिळत नसल्याने लखनऊमधील सर्कल अधिकाऱ्याने थेट नोकरीचा राजीनामा दिला आहे. मनीष सोनकर हे उत्तर प्रदेशातील झाशी येथे सर्कल ऑफिसर होते.

    मनीष सोनकर यांनी आपल्या राजीनाम्याची प्रत झाशीचे एसएसपी रोहन पी कनय आणि राज्यपालांकडेही पाठवली आहे. याबाबतची माहिती स्वतः रोहन पी कनय यांनी दिली आहे. याप्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा केल्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

    कोरोना काळातही कामावर जात असल्याने सोनकर हे घरामध्येही आपल्या पत्नी आणि मुलीच्या सुरक्षिततेसाठी वेगळ्या खोलीत राहात होते. मात्र, दोन आठवड्यांपूर्वी त्यांच्या पत्नीला अचानक ताप येण्यास सुरुवात झाली. यापाठोपाठ २० एप्रिलला सोनकर यांनाही ताप आला. यानंतर त्यांनी कोरोना चाचणी केली मात्र ती पाच वेळा निगेटिव्ह आली. त्यामुळे, सोनकर आपल्या कामावर जात राहिले. मात्र, पुढे ३० एप्रिलला त्यांच्या पत्नीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्यानं त्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले. अशात मुलीला सांभाळण्याची संपूर्ण जबाबदारी सोनकर यांच्याकडे आली. मात्र याच काळात पंचायत निवडणुकांच्या मतमोजणीसाठी सोनकर यांची नियुक्ती केली गेली.

    या परिस्थितीमध्ये मुलीची काळजी घेणे जास्त गरजेचे असल्याने सोनकर यांनी ताबडतोब एसएसपींसोबत चर्चा केली आणि त्यांना या संपूर्ण परिस्थितीबाबत माहिती दिली. त्यांना यासाठी सुट्टीही मागितली मात्र त्यांची नियुक्ती २ आणि ३ मेपर्यंत पंचायत निवडणुकीच्या मतमोजणी केंद्रावर करण्यात आली. याच कारणामुळे मुलीच्या देखभालीसाठीही सुट्टी मिळत नसल्याने नकर यांनी थेट राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. यानंतर आता त्यांना सुट्टी देण्यात आली असून त्यांचा राजीनामा अद्याप स्विकारलेल्या नाही. याप्रकरणी तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल, असे कानपूर झोनचे एडीजी भानू भास्कर यांनी सांगितले आहे.