मशिदींवरील भोंग्यांमुळे उत्तर प्रदेश आणि कर्नाटकातील नागरिक हैराण, साखर झोपेचे खोबरे झाल्यामुळे जिल्हा दंडाधिकाऱ्यांना लिहिलं पत्र…

अलाहाबाद विद्यापीठाच्या कुलगुरू संगीता श्रीवास्तव यांच्या घराजवळ ही मशीद आहे. मशिदीवरील भोंग्यांचे तोंड श्रीवास्तव यांच्या घराच्या दिशेने होते. रोज पहाटे त्यावरून अजान व्हायची. त्या आवाजाने श्रीवास्तव यांची नेहमी झोपमोड व्हायची. 'आपण कोणत्याही जातीधर्माविरोधात नाही. भोंग्याशिवायही अजान दिली जाऊ शकते. जेणेकरून इतरांना त्रास होणार नाही आणि त्यांची दिनचर्या बिघडणार नाही.

  मिशिदींवरील भोंग्यांच्या आवाजामुळे उत्तर प्रदेश आणि कर्नाटकातील नागरिक अक्षरश: हैराण झाले आहेत. साखरझोपेचे खाबरे झाल्यामुळे उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील जिल्हा दंडाधिकाऱ्यांना पत्र लिहिण्यात आलं आहे. भोंग्यांची कर्णकर्कशता लोकांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य बिघडवते. त्यामुळे बंद करा हे भोंगे..अशा बंदीची अजान उत्तर प्रदेश आणि कर्नाटकात देण्यात आली आहे.

  उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथील अलाहाबाद विद्यापीठाचे कुलगुरू त्यांच्या घराजवळील मशिदीवरील भोंग्यावरून मोठय़ा आवाजात दिल्या जाणाऱ्या अजानमुळे अक्षरशः हैराण झाले होते. त्यामुळे त्यांनी जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे त्याबाबत पत्र लिहून आक्षेप नोंदवला होता. ते पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मशिदीच्या प्रशासनाने भोंग्याची दिशा बदलली. इतकेच नव्हे तर आवाजही कमी केला.

  कुलगुरूंचं जिल्हा दंडाधिकाऱ्यांना पत्र

  अलाहाबाद विद्यापीठाच्या कुलगुरू संगीता श्रीवास्तव यांच्या घराजवळ ही मशीद आहे. मशिदीवरील भोंग्यांचे तोंड श्रीवास्तव यांच्या घराच्या दिशेने होते. रोज पहाटे त्यावरून अजान व्हायची. त्या आवाजाने श्रीवास्तव यांची नेहमी झोपमोड व्हायची. ‘आपण कोणत्याही जातीधर्माविरोधात नाही. भोंग्याशिवायही अजान दिली जाऊ शकते. जेणेकरून इतरांना त्रास होणार नाही आणि त्यांची दिनचर्या बिघडणार नाही. ईदपूर्वीही हे लोक घोषणा सुरू करतात. ती पहाटे चार वाजता दिली जाते. त्यामुळे लोकांना त्रास होतो. संविधानाने प्रत्येकाला शांततेने राहण्याचा अधिकार दिला आहे. असे पत्र त्यांनी जिल्हा दंडाधिकाऱयांना दिले होते.

  हे पत्र व्हायरल झाल्यानंतर संबंधित मशिदीच्या समितीने श्रीवास्तव यांनी आक्षेप घेतल्याने त्यांच्या घराच्या दिशेने असलेल्या भोंग्यांची दिशा बदलली गेल्याचे तसेच भोंग्यांचा आवाज ५० टक्के कमी करण्यात आल्याचे सांगितले.

  कर्नाटकात वक्फ बोर्डनेचं आवाज केला बंद

  कर्नाटकात मशिदी आणि दर्ग्यांवरील भोंगे यापुढे रात्री १० ते सकाळी ६ पर्यंत आवाज करणार नाहीत. कर्नाटक वक्फ बोर्डानेच त्यांचा आवाज बंद केला आहे. भोंग्यांच्या आवाजामुळे लोकांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम होत असल्याने रात्री १० वाजल्यापासून सकाळी ६ वाजेपर्यंत भोंग्यांचा वापर करता येणार नाही असे पत्रक वक्फ बोर्डाने जारी केले आहे. परंतु वक्फ बोर्डाच्या या पत्रकाला काही मशिदींनी आक्षेप घेतला आहे. बंगळुरूच्या खतीब-ओ-इमाम मशिदीचा त्यात समावेश आहे. त्या मशिदीचे मकसूद इमरान यांनी आपल्याला वक्फ बोर्डाचे पत्रक मिळाल्याचे सांगितले. मात्र इस्लाममध्ये सकाळचे नमाज पठण महत्वाचे असल्याने वक्फ बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्यात बदल करावेत अशी मागणी त्यांनी केली आहे.