जम्मूतील राजोरीमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, एक जवान शहीद

सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांच्या प्रत्येक गोळीला चोख प्रत्युत्तर देत आहेत. राजौरी जिल्ह्यात गुरुवारी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत एक जवान जखमी झाला. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी थानामंडी परिसरात शोधमोहीम सुरू केली.

    जम्मूतील राजोरी या विभागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. यामध्ये एक जवान शहीद झाल्याची माहिती मिळाली आहे. तर थानामंडी या परिसरात दहशतवाद्यांच्या उपस्थितीत महितीवर सुरक्षा दलाचे संयुक्त पथक परिसरात शोधमोहीम राबवत होते.मिळालेल्या माहितीनुसार, 3 ते 4 दहशतवादी जंगल परिसरात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

    सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांच्या प्रत्येक गोळीला चोख प्रत्युत्तर देत आहेत. राजौरी जिल्ह्यात गुरुवारी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत एक जवान जखमी झाला. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी थानामंडी परिसरात शोधमोहीम सुरू केली.

    अधिकाऱ्याने सांगितले की, जेव्हा दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. तेव्हा शोध मोहीम चकमकीत बदलली. तसेच सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.