Sudden shutdown of oxygen supply; 22 patients died like fish

मृत्यूची रंगीत तालीम करण्यात आल्याचे आरोप झालेल्या पारस रुग्णालयाचे संचालक डॉ. अरिंजय जैन यांना तपासाअंती क्लीन चिट देण्यात आली आहे. जैन यांनी पाच मिनिटे कोविड रुग्णांचा ऑक्सिजन पुरवठा रोखण्याचे आदेश दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर या रंगीत तालिमीदरम्यान 22 रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप होता. व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर उत्तर प्रदेशातील योगी सरकारने रुग्णालयाला टाळेही ठोकले होते. तथापि आता या रुग्णालयाला क्लिन चिट देण्यात आली आहे.

  आग्रा : मृत्यूची रंगीत तालीम करण्यात आल्याचे आरोप झालेल्या पारस रुग्णालयाचे संचालक डॉ. अरिंजय जैन यांना तपासाअंती क्लीन चिट देण्यात आली आहे. जैन यांनी पाच मिनिटे कोविड रुग्णांचा ऑक्सिजन पुरवठा रोखण्याचे आदेश दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर या रंगीत तालिमीदरम्यान 22 रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप होता. व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर उत्तर प्रदेशातील योगी सरकारने रुग्णालयाला टाळेही ठोकले होते. तथापि आता या रुग्णालयाला क्लिन चिट देण्यात आली आहे.

  मुख्यमंत्री योगींकडे करणार तक्रार

  पारस रुग्णालयाला जिल्हाधिकाऱ्यांद्वारे क्लिन चिट देण्याच्या निर्णयावर लोकप्रतिनिधींनी आक्षेप घेतला आहे. या प्रकरणाची तक्रार आता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे ते करणार असल्याचे समजते. तपास अहवालात 16 जणांचा मृत्यू झाल्याची बाब मान्य करण्यात आली असून या प्रकरणात रुग्णालय संचालकास जबाबदार ठरविण्यात आलेले नाही. यासोबतच पीडितांच्या जबाबचाही उल्लेख नाही. जैन यांच्या एकतर्फी जबाबावरच अहवाल तयार करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे.

  समितीचे निरीक्षण

  • ऑक्सिजन पुरवठा बंद करण्याची रंगीत तालिम केल्यानंतर 22 रुग्णांचा मृत्यू झाल्याचे वृत्त खरे नाही.
  • तालिमी दरम्यान ऑक्सिजन पुरवठा रोखण्यात आला असल्याचे पुरावेच नाहीत.
  • 25 एप्रिल रोजी रुग्णालयात 20 आरक्षित सिलिंडर्ससह 149 सिलिंडर आणि 26 एप्रिल रोजी 21 सिलिंडरचा पुरवठा करण्यात आला होता. हे सिलिंडर रुग्णांसाठी पुरेसे होते.
  • परीक्षणादरम्यान 22 रुग्ण गंभीर होते. मृत झालेल्या 16 पैकी 14 जणांना गंभीर आजार होते आणि दोन जणांना कोणताही आजार नव्हता.
  हे सुद्धा वाचा