हिमाचल प्रदेशमधील धर्मशाळा येथे ढगफुटी ; अनेक ठिकाणी पाणी शिरले

या नाल्याच्या दुतर्फा अनेक हॉटेल्स आहेत. मात्र घटनेत जीवितहानी झाल्याची अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. पण आपत्ती विभागाला या घटनेची माहिती देण्यात आली आहे.

    नवी दिल्ली: उत्तर भारतात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला असून, जोरात पाऊस कोसळत आहे. हिमाचल प्रदेशातील पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या धर्मशाळा येथे ढगफुटी झाल्यानं भागसू भागात मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे त्या भागातील वाहनांचं मोठे नुकसान झालं आहे. अनेक पर्यटकांची चारचाकी वाहनं देखील पाण्यासोबत वाहून गेली आहेत. या भागात पाणी शिरल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

    याठिकाणी हजारोंच्या संख्येनं पर्यटक येत असतात. अशात ही ढगफुटी झाल्यानं असंख्य पर्यटक घटनास्थळी अडकून पडले आहेत. त्या परिसरात असलेल्या अरुंद नालाअसून ढगफुटीच्या पाण्यामुळे हा नाला ओसंडून वाहत आहे. या नाल्याच्या दुतर्फा अनेक हॉटेल्स आहेत. मात्र घटनेत जीवितहानी झाल्याची अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. पण आपत्ती विभागाला या घटनेची माहिती देण्यात आली आहे. पाण्याच्या ओव्हर फ्लोमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात वेगानं व्हायरल होतं आहे.