cobra rescue operation

एका विषारी कोब्राला मृत्यूच्या (Cobra rescue video) दारातून परत आणण्यासाठी तरुणाने जीवघेणा असा प्रयोग केला. हा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.

    रांची: सध्या सोशल मीडियावर एक असा व्हिडिओ (Snake Viral video) व्हायरल होतो आहे, ज्यात एक तरुण स्वतःचा जीव धोक्यात घालून सापाला (Cobra video) वाचवण्यासाठी धडपडत आहे. या तरुणाने चक्क विषारी कोब्राला (Cobra Snake)आपल्या तोंडाने श्वास देऊन वाचवण्याचा प्रयत्न केला आहे.

    एका विषारी कोब्राला मृत्यूच्या (Cobra rescue video) दारातून परत आणण्यासाठी तरुणाने जीवघेणा असा प्रयोग केला. हा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.

    हा व्हिडिओ ओडिसामधील आहे. एका घरात हा कोब्रा घुसला होता. त्याची माहिती सर्पमित्रांना देण्यात आली. सर्पमित्रांची टीम याठिकाणी दाखल झाली आणि त्यांनी सापाला घरातून बाहेर काढलं. त्याला मोकळ्या जागेत आणलं. जवळपास ८ ते १० फूट लांब हा साप पाहताच सर्वांची घाबरगुंडी उडाली. सापाला जमिनीवर ठेवलं पण त्याची हालचाल होत नव्हती.

    साप श्वास घेऊ शकत नाही आहे, ही बाब सर्पमित्रांच्या लक्षात आली. त्यानंतर त्यांनी आपल्या जीवाचा विचार न करता या सापाचा जीव वाचण्यासाठी धडपड सुरू केली. व्हिडिओत आपण पाहू शकतो की या तरुणाने आपल्या हातात मृतावस्थेत असलेल्या एका सापाला घेतलं आहे. त्या सापाच्या तोंडात त्याने एक छोटा पाईप टाकला आहे. हाच पाईप या तरुणाच्याही तोंडात आहे. कोल्ड्रींक पिण्यासाठी जो स्ट्रॉ वापरला जातो, त्या स्ट्रॉचा त्यांनी वापर केला. सापाला तोंडाजवळ धरून त्याचं तोंड उघडून तो पाईपावाटे आपला श्वास त्या सापाला देतो आहे आणि त्याला जिवंत करण्याचा प्रयत्न करत आहे.

    त्याचा हा प्रयत्न यशस्वीसुद्धा होतो. काही वेळातच सापाची हालचाल झाली. सापाच्या थांबलेल्या श्वास तरुण आपला श्वास देऊन सुरू करतो. त्यानंतर त्याला जंगलात सुरक्षित ठिकाणीसुद्धा सोडून येतो.