काँग्रेस-AIUDF ची युतीच ‘महाखोट’; आसामात ‘विजय’ भाजपाचाच – देवेंद्र फडणवीस

आमच्या विरोधकांनीही भाजपाच आसाममध्ये विजयी होणार असल्याचा दावा केला आहे. तथापि शरद पवार यांच्या विधानाशी मी पूर्णत: सहमत नाही. भाजप निश्चितच आसाम व अन्य राज्यातही विजयी होईल. परंतु भाजपाचा आसाममध्ये विजय होईल असे ते मानत असतील तर निश्चितच आम्ही मोठा विजय प्राप्त करु असे मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.

    गुवाहाटी: भाजपा नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी यांनी आसाममध्ये काँग्रेस आणि बदरुद्दीन अजमल यांच्या एआययूडीएफ या युतीला ‘महाखोट’ अशी उपमा दिली आणि ही युती राज्यातील सामाजिक व सांस्कृतिक ठेवाच नष्ट करेल असा आरोप केला. नलबाडी येथील एका सभेला ते संबोधित करीत होते. दोन्ही पक्षांची युती राजकीय महत्त्वाकांक्षा पूर्तीसाठीच झाली असल्याचे ते म्हणाले. भाजपाचा पराभव हाच त्यांचा अजेंडा असला तरी जनता मात्र या महाखोटला नाकारतील असा दावा फडणवीस यांनी केला.

    आमच्या विरोधकांनीही भाजपाच आसाममध्ये विजयी होणार असल्याचा दावा केला आहे. तथापि शरद पवार यांच्या विधानाशी मी पूर्णत: सहमत नाही. भाजप निश्चितच आसाम व अन्य राज्यातही विजयी होईल. परंतु भाजपाचा आसाममध्ये विजय होईल असे ते मानत असतील तर निश्चितच आम्ही मोठा विजय प्राप्त करु असे मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.

    आंतरराष्ट्रीय सीमा सुरक्षित होणार
    दरम्यान घुसखोरांना परत पाठविण्याच्या भाजपाच्या आश्वासनावर बोलताना केंद्र सरकारेन बांगलादेश सोबतची सीमा सील केली आहे असे सांगत सर्वप्रथम त्यांचा प्रवेश आपल्याला रोखावा लागेल त्यानंतच सरकार कारवाईबाबत विचार करू शकते असे ते म्हणाले. घुसखोरांना पायबंद बसावा म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेजारील देशांसोबतच्या आंतरराष्ट्रीय सीमा सुरक्षित व मजबूत करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू केले आहेत असेही फडणवीस म्हणाले. बांगलादेश असो वा पाकिस्तान देशाच्या सीमा आता पूर्णत: सुरक्षित आहे, असा दावाही त्यांनी केला.