उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांपूर्वीच काँग्रेसला धक्का; राज्यातील मोठ्या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

काँग्रेसचा (Congress) मोठा चेहरा असलेले जितिन प्रसाद थोड्याच वेळात भाजपात प्रवेश करणार आहेत. प्रसाद केंद्रीय़ मंत्री पीयूष गोयल (Piyush goyal) यांच्या दिल्लीतील निवासस्थानी पोहोचले आहेत.

    लखनऊ : उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीची (Uttar Pradesh election) तयारीने वेग घेतला आहे. काँग्रेस सुस्त पडलेली असताना भाजपाने मुख्यमंत्र्यांपासून आमदारांच्या कामाचा आढावा आणि मतदारसंघातील वातावरणाचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. याचबरोबर आज भाजपानेकाँग्रेसला जोरदार झटका देण्याची मोठी तयारी केली आहे.

    काँग्रेसचा (Congress) मोठा चेहरा असलेले जितिन प्रसाद थोड्याच वेळात भाजपात प्रवेश करणार आहेत. प्रसाद केंद्रीय़ मंत्री पीयूष गोयल (Piyush goyal) यांच्या दिल्लीतील निवासस्थानी पोहोचले आहेत.

    जितीन प्रसाद यांनी, काँग्रेसप्रणित यूपीए-2 सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली होती. ते उत्तर प्रदेशातील काँग्रेसचा ब्राह्मण चेहरा म्हणून ओळखले जायचे. काँग्रेस पक्षामध्ये असताना त्यांनी पक्ष संघटनेतील महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या होत्या. काही महिन्यांपूर्वीच त्यांच्याकडे एआयसीसी बंगालच्या सचिव पदाची धुरा देण्यात आली होती.