कर्नाटक विधानपरिषेदत गोरक्षा कायद्यावरुन जोरदार राडा, आमदारांनी उपसभापतींना…

काँग्रेसच्या ( Congress MLCs) आमदारांनी विधानपरिषेदच्या उपसभापतींना (chairman of the legislative council) अक्षरश: सभागृहातून खेचून नेत बाहेर काढले. विधानपरिषेदत गोरक्षा कायद्यावरुन जोरदार राडा झाल्यामुळे हा सगळा गोंधळ शांत करण्यासाठी सभागृहात मार्शल्सना पाचारण करावे लागले.

बंगळुरु: कर्नाटक सरकारने (Karnataka Government)गायींची रक्षा करणाऱ्या व्यक्तींच्या संरक्षणासाठी एक विधेयक सभागृहात (Karnataka Assembly) मांडले होते. मात्र, या विधेयकामुळे गोरक्षकांना संरक्षण मिळेल, असा विरोधकांचा आक्षेप आहे. दरम्यान, काँग्रेसच्या आमदारांनी विधानपरिषेदच्या उपसभापतींना (chairman of the legislative council) अक्षरश: सभागृहातून खेचून नेत बाहेर काढले. विधानपरिषेदत गोरक्षा कायद्यावरुन जोरदार राडा झाल्यामुळे हा सगळा गोंधळ शांत करण्यासाठी सभागृहात मार्शल्सना पाचारण करावे लागले.

भाजप आणि जनता दलाने असंवैधानिक पद्धतीने उपसभापतींना खुर्चीत बसवले. हा प्रकार दुर्दैवी आहे. काँग्रेसने त्यांना सभापतींच्या आसनावरून खाली उतरायला सांगितले. ते अवैधरित्या सभापतींच्या आसनावर बसल्यामुळे आम्ही त्यांना सभागृहाबाहेर काढले, अशी प्रतिक्रिया काँग्रेस आमदार प्रकाश राठोड यांनी व्यक्त केली आहे.

काँग्रेसच्या आमदारांनी गुंडांसारखे उपसभापतींना आसनावरून खेचले आणि त्यांच्याशी गैरवर्तन केले. त्यामुळे कर्नाटक विधानपरिषदेच्या आजवरच्या इतिहासात असा प्रकार पहिल्यांदाच घडला आहे. जनता आमच्याबद्दल काय विचार करत असेल हा विचार करुन मला शरम वाटत आहे, असे वक्तव्य भाजप आमदार लेहर सिंग सिरोया यांनी केले.