virbhadra sing

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विरभद्र सिंग (Virbhadra Sing Passed Away) यांचं निधन झालं आहे. आज शिमला येथे पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

    हिमाचल प्रदेशचे(Himachal Pradesh) माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विरभद्र सिंग (Virbhadra Sing Passed Away) यांचं निधन झालं आहे. आज शिमला येथे पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ८७ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून आजारी असणारे विरभद्र सिंग यांचे इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजमध्ये(Indira Gandhi Medical College) पहाटे ३ वाजून ४० मिनिटांनी निधन झाले, अशी माहिती रुग्णालयाचे वरिष्ठ वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर जनक राज यांनी दिली आहे.

    विरभद्र सिंग यांना सोमवारी ह्रदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांना रुग्णालयात आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं होतं. श्वसनाचा त्रास होऊ लागल्यानंतर डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं अशी माहिती डॉक्टर जनक राज यांनी दिली आहे. नऊ वेळा आमदार आणि पाच वेळा खासदार राहिलेल्या विरभद्र सिंग यांनी सहा वेळा हिमाचल प्रदेशचं मुख्यमंत्रीपद भूषवलं होतं.


    विरभद्र सिंग यांना जून महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. दोन महिन्यात दोन वेळा त्यांनी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. याआधी १२ एप्रिलला त्यांची टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना चंदिगडमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. कोरोनामधून बरं झाल्यानंतर ३० एप्रिल रोजी रुग्णालयातून घरी परतल्यानंतर काही तासातच त्यांना श्वसनाचा आणि ह्दयासंबंधी त्रास जाणवू लागला होता. तेव्हापासून ते रुग्णालयात दाखल होते.