sharad pawar

पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसचा लढा हा सत्ताधारी तृणमूल काँग्रेस पक्षाशी आहे. तुमच्यासारखे स्टार प्रचारक तृणमूल काँग्रेसच्या व्यासपीठावर गेले तर सामान्य मतदारांच्या मनातील शंका वाढेल. त्यामुळे आपण तृणमूल काँग्रेसच्या प्रचारात ममता बॅनर्जी यांच्या बाजूने उतरू नये, अशा प्रकारचं पत्र बंगालमधील काँग्रेसचे नेते आणि खासदार प्रदीप भट्टाचार्य यांनी शरद पवार आणि राजदचे नेते तेजस्वी यादव यांना लिहिले आहे.

  नवी दिल्ली: पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकींचे वारे वाहत आहेत. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या पायाल दुखापती झाली असून सुद्धा त्या प्रचार करत आहेत. या निवडणुकीच्या रणसंग्रामात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ममता बॅनर्जी यांच्या बाजूने रिंगणात उतरू नये, अशा प्रकारचं विनंती पत्र काँग्रेसच्या नेत्याकडून लिहिण्यात आलं आहे.

  पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसचा लढा हा सत्ताधारी तृणमूल काँग्रेस पक्षाशी आहे. तुमच्यासारखे स्टार प्रचारक तृणमूल काँग्रेसच्या व्यासपीठावर गेले तर सामान्य मतदारांच्या मनातील शंका वाढेल. त्यामुळे आपण तृणमूल काँग्रेसच्या प्रचारात ममता बॅनर्जी यांच्या बाजूने उतरू नये, अशा प्रकारचं पत्र बंगालमधील काँग्रेसचे नेते आणि खासदार प्रदीप भट्टाचार्य यांनी शरद पवार आणि राजदचे नेते तेजस्वी यादव यांना लिहिले आहे.

  शरद पवार आणि तेजस्वी यादव युतीधर्माच्या बंधनात

  महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष महाविकासआघाडीचा भाग आहे. यामध्ये काँग्रेस पक्षाचाही समावेश आहे. परंतु पश्चिम बंगालमध्ये शरद पवार तृणमूलच्या प्रचारास गेल्यास काँग्रेसचा विरोधक असणाऱ्या नेत्यांना ही बाब खटकू शकते. तर दुसरीकडे बिहारमध्ये तेजस्वी यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाची काँग्रेसशी युती आहे. त्यामुळे यादवही युतीधर्माच्या बंधनात अडकलेले आहेत.

  पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यात होणार मतदान

  पश्चिम बंगालमधील विधानसभेच्या २९४ जागांसाठी आठ टप्प्यात मतदान होणार आहे. केरळ, आसाम, पुद्दुचेरी, तामिळनाडू या राज्यासंह २ मे रोजी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार असल्याचं सांगितलं जात आहे.